Photo Credit- Social Media ( हरयाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीने बदलली स्ट्रॅटेजी)
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. राजकीय पक्षांच्या जोरदार मोर्चेबांधण, सभा, बैठका, दौरे, मेळाव्यांची लगबग सुरू आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत असतानाच काल ( 8 ऑक्टोबरला) हरयाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. हरयाणात भाजपचा तर जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेसचा विजय झाला. या निवडणुकांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवरही होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये मोठी फाईट होणार आहे. महायुतीलील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांची लढत होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे एकाच मतदारसंघात प्रतिस्पर्धी एकाच आघाडीतल असणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरीही होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही मतदारांना मिळणार आहे. त्यात मनोज जरांगे पाटलांनाही सोबत घेण्यासाठी तिसऱ्या आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी? हरयाणातील निकालाचे महाराष्ट्रावर पडसाद?
दरम्यान, काल हरयाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीपूर्वी हरयाणात काँग्रेसचा विजय होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हरयाणात एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोट ठरवत भाजपने बहुमताचा आकडा गाठत दणदणीत विजय मिळवला. हरयाणाच्या निकानंतर महाराष्ट्रातही भाजपने आपले स्टाईल बदलल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसात, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इमकमिंग सुरू झाले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत असणारही सहानुभूतीची लाट कायम आहे. याशिवाय बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महायुती काही प्रमाणात बॅकफूटवर गेली होते. पण हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. पण त्यानंतरही महायुतीलला अपेक्षित असा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे महायुतीत काही प्रमाणात नाराजीही दिसून येत होती. पण कालच्या हरयाणाच्या निकालामुळे महायुतीला एक नवा बुस्टर मिळाला आहे. महाराष्ट्रात महायुतीतील नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यापार्श्वभूमीवर हरयाणातील विजय भाजपसाठी हा बुस्टर डोस मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने मित्रपक्ष असेल्लया शिंदे गटाच्या आमदार असलेल्या जागांव्यतिरिक्त कोणत्या मतदारसंघात निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असलेले उमेदवार आहेत, याबाबत भाजपने विचारणा केली आहे. विद्यमान आमदारांच्या जागा वगळता इतर कोणतीही जागा हवी असेल तर, जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार दाखवा आणि मगच मतदारसंघ घ्या, अशी भाजपची स्ट्रॅटेजी असणार आहे.
तर येत्या आठवडाभरात भाजपची पहिली यादी दाहीर केली जाईल विधासनभाच्या उमेदवार निश्चित करण्यासाठी पुढच्या दोन दिवसात भाजपच्या बैठका होतील. उमेदवारांची निवड प्रक्रिया जाहीर केली जाईल. त्यासाठी काल रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर बैठकही झाली. त्यानंतर इतर विभागांसाठीही बैठका होणार असल्याचे सांगितले जात आहे.