मुंबई – माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टाॅक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळाप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. यापूर्वी पांडे यांची ईडीने चौकशी केली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई आज सायंकाळी दिल्लीत करण्यात आली.
एनएसई फोन टॅपींग प्रकरणी संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याकरिता दिल्लीतील ईडी कार्यालयात आज हजर राहण्यासाठी त्यांना समन्स पाठवले होते. तेथे चौकशी झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. गत आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.