Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकरमान्यांनो, वाहतूक कोंडीमुळे होतेय पंचाईत, मुंबई-गोवा महामार्गावरील विघ्न संपेना, ‘हे’ रस्ते फुल्ल

कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईतील गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. सात तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जायला निघाले. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील विघ्न संपायचं नाव घेतं नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 06, 2024 | 09:55 AM
वाहतूक कोंडीमुळे होतेय पंचाईत, मुंबई-गोवा महामार्गावरील विघ्न संपेना, 'हे' रस्ते फुल्ल

वाहतूक कोंडीमुळे होतेय पंचाईत, मुंबई-गोवा महामार्गावरील विघ्न संपेना, 'हे' रस्ते फुल्ल

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव सणासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने मुंबईतील गणेशभक्त कोकणात आपल्या गावी दर्शनासाठी निघाले आहेत. मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. कोकणात जाण्यासाठी हजाराच्या आसपास एसटी बसेस सोडल्या जात आहेत. ज्या गणेशभक्तांना एसटी बस आणि रेल्वेचे तिकीट मिळालेले नाही, असे गणेशभक्त स्वत: गाडी करुन जात आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबागजवळील लोणेरे परिसरात सहापासून सात किलोमीटरपर्यंत वाहने लंबवत धावत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

मुंबई गोवा महामार्गासमवेत पर्यायी रस्त्यांवरही सध्या मोठ्या संख्येनं वाहनांची वर्दळ सुरू असून, त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या चाकरमान्यांसाठी एसटी बस, खासगी वाहनं आणि चारचाकी गाड्यांपासून दूचाकीपर्यंत शक्य त्या सर्व वाहनांचा वापर करत ही मंडळी कोकणात निघाली असली तरी त्यांच्यापुढे असणारं वाहतूक कोंडींटे विघ्न मात्र काही केल्या कमी होण्याच किंवा संपायचं नाव घेत नाही. एकिकडे रस्त्यांवरील खड्डे तर दुसरीकडे पावसामुळं झालेला चिखल आणि त्याच चिखलाडून कासवगतीनं पुढे जाणारी वाहनं असं चित्र असल्यामुळं वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वडखळ ते कासू , कोलाड, लोणेरे वाहतूक ठप्प असून, या वाटांवर हजारो वाहनं अडकल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रायगड पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रवाशांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी का होते?

गणेशोत्सव काळात कोकणाकडे जाणारी वाहतूक कोंडी ही काही नवीन गोष्ट नाही. पण, इथे काही वेगळी कारणे समोर आली आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पन्नास टक्के काम बाकी असताना, महाड तालुक्यापासून कोकणापर्यंतचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान अनेकजण गावकडे किंवा मरगळला पसंती देत ​​असल्याने माणगाव, लोणेरे, मंदिर परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मधोमध पाणी, पूरस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, पावसामुळे होणारी चिखल यामुळे या समस्येत भर पडत असून, तेथून तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.

मुंबईतून कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

मुंबई गोवा महामार्ग (मुंबई- नवीमुंबई-पनवेल-महाड)
मुंबई-वाशी-पामबीच-उरणफाटा- खारपाडा- वडखळ-महाड
मुंबई पुणे दृतगती मार्ग(मुंबई- खालापुर- पेण- महाड)
मुंबई पुणे दृतगती मार्ग( मुंबई-खालापुर- पाली- वाकण- माणगाव- महाड)
मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- उंब्रज- पाटण- चिपळुण)
मुंबई पुणे दृतगती मार्ग( सातारा- कराड- कोल्हापुर- राधानगरी मार्गे कणकवली)
मुंबई पुणे दृतगती मार्ग (सातारा- कराड- कोल्हापुर- आंबोली मार्गे सावंतवाडी)
मुबईतून अटल सेतू मार्गे पळस्पे येथून मुंबई गोवा महामार्ग

Web Title: Ganesh chaturthi 2024 traffic congestion on the mumbai goa highway for the second day in a row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
1

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.