Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anant Chaturdashi 2025 : लाडक्या बाप्पाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप; पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. मुंबईत 21000 हून अधिक पोलिस तैनात असणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 06, 2025 | 07:33 AM
लाडक्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप

लाडक्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषात शनिवारी लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरोघरी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळांसह यंत्रणा सज्ज आहे. बाप्पाचे विसर्जन करताना मन अतिशय निराश होते, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते.

धार्मिक भावना दुखावू नयेत आणि सार्वजनिक शांतता राखावी या उद्देशाने, महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी एक आदेश जारी केला, ज्यामध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणे व प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. नैसर्गिक जलस्रोतांमध्ये किवा कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्तीचे दृश्य दाखवणे आणि प्रसारित करणे धार्मिक भावना दुखावू शकते आणि सार्वजनिक शांतता बिघडू शकते, असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. मुंबईत 21000 हून अधिक पोलिस तैनात असणार आहेत. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे पोलिस तैनात केले जातील, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

वाहतूक नियंत्रणात होणार एआयची मदत

पहिल्यांदाच, पोलिस मार्ग व्यवस्थापन आणि इतर वाहतूक संबंधित अद्यतनांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करतील. या तैनातीत 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 उपायुक्त, 61 सहाय्यक आयुक्त, 3000 अधिकारी आणि 18000 पोलिसांचा समावेश असेल. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या 14 कंपन्या, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार कंपन्या, जलद प्रतिक्रिया पथके आणि बॉम्ब निकामी पथके देखील तैनात केली जातील.

शहरात तब्बल 419 कृत्रिम तलावाची निर्मिती

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने 419 कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. स्वस्तिक फॉरमेशनमध्ये तिथे कृत्रिम तलाव मांडण्यात आले आहे. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून, हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे.

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला लवकरच सुरुवात

पुण्यात पहिला मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतो. लाल-पांढऱ्या पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांची फौज, ढोल, लेझिम, झांज पथकांचा गजर आणि ‘ग्रामदैवताला निरोप’ देणाऱ्या भाविकांची गर्दी असणार आहे.

Web Title: Ganpati bappa immersion will be done today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 07:27 AM

Topics:  

संबंधित बातम्या

Eid E Milad 2025 Holiday: 8 सप्टेंबरलाही शाळा, कॉलेज, ऑफीस राहणार बंद, काय आहे सरकारचा निर्णय?
1

Eid E Milad 2025 Holiday: 8 सप्टेंबरलाही शाळा, कॉलेज, ऑफीस राहणार बंद, काय आहे सरकारचा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.