राज्यात जीबीएसचा धोका वाढतोय पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू; पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास * पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. जीबीएस आजाराने पुण्यात शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीचा बळी गेला आहे. पुण्यात सिंहगड परिसरात शिकत होती. तिला पाणीपुरी खाल्यानंतर त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तिची तब्येत खालावली तिच्यावर बारामतीत रुग्णालयात उपचार सुरु होते. तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जीबीएस आजाराचा धोका वाढत असून बळी वाढत चालले आहेत. तीन आठवड्यापूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता. ही तरुणी बारामतीत पोहोचल्यानंतर तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना तपासणी केली. अमरावतीत जीबीएसचा शिरकाव जीबीएस आजाराचा रुग्ण अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. ६५ वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती १२ दिवसापूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र या रुग्णामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगावात बालकाला लागण जळगावात तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागातील अतिदक्षता वॉर्डात या बालकावर उपचार सुरू आहेत. रक्ताची तपासणी केली होती.
पुणे : शहरात ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (GBS) हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यामुळे बाधितग्रस्त भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
हेदेखील वाचा : Shirdi Saibaba Temple : शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान अॅक्शन मोडवर ; निर्णयाची अंमलबजावणी उद्याच होणार
गेल्या महिन्याभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी , नांदोशी आदी परिसरात जीबीएस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. हा आजार दूषित पाण्यामुळे, अन्नामुळे होत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. महापालिकेकडून या भागातील पाण्याचे स्त्रोत, खासगी टॅंकर व्यावसायिक, आरओ प्लांट व्यावसायिक आदी ठिकाणी पाण्याचे नमूने घेतले गेले.
तसेच या भागातील मांस विक्रेत्यांकडून नमूने घेतले गेले. आजाराची बाधा झालेल्या रुग्णांचे शौच, लघवी, रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदर नमूने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीनंतर एनआयव्हीकडून अहवाल आणि महापालिकेला काही सूचना देण्यात आल्या.
याविषयी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट होत असून, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील तो होऊ शकतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेने या भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी इतक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्यात हे केंद्र उभे केले जाईल. तसेच एनआयव्हीकडून पाण्यांचे नमूने घेताना ते दोन लिटर इतके घ्यावेत, तसेच ते दोन महिने साठवून ठेवून त्याची पुन्हा तपासणी करावी अशा सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून नमूने पाठविण्यासंदर्भात सहकार्य केले जात नसल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे. ’’
– पुणे शहरात आजपर्यंत १२० संशयित रुग्ण आढळून आले, हिंगणे खुर्द येथे आणखी एका रुग्णाची नव्याने नाेंद झाली.
– शहरातील ४१ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात आले आहे.
– रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यासाठी सर्व रुग्णालयात एक समुपदेशक नियुक्त करण्यास सुुरुवात केली गेली.
– आजारातून बरे झालेल्या रुग्णांना फिजीओथेरपी देण्यासाठी कमला नेहरू रुग्णालय, स्व.राजीव गांधी रुग्णालय, साेनावणे रुग्णालय येथे फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे.
हेदेखील वाचा : “अनैतिक धंदे चालू आहेत मटका , जुगार ,दारु तुमच्याच ताफ्यात असतात”; माजी आमदार परशुराम उपरकरांचा नितेश राणेंवर घणाघात