Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंगोलीत अघोरी कृत्य; कांस्य धातूच्या तांब्यांची केली पूजा, हळद-कुंकू अन्…

मध्यरात्री वसमत तालुक्यातील महमंदपुरवाडी रस्त्याच्या मधोमध नक्षीकाम केलेला जुना कांस्य धातूचा तांब्या तसेच पूजेचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्या तांब्याला हळद-कुंकू लावलेले असल्याचेही दिसून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 01:17 PM
हिंगोलीत अघोरी कृत्य; कांस्य धातूच्या तांब्यांची केली पूजा, हळद-कुंकू अन्...

हिंगोलीत अघोरी कृत्य; कांस्य धातूच्या तांब्यांची केली पूजा, हळद-कुंकू अन्...

Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच हिंगोलीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मधोमध अज्ञात व्यक्तींनी नक्षीकाम केलेला जुना कांस्य धातूचा तांब्या, त्याला हळद-कुंकू लावून पूजेचे साहित्य २९ मार्चच्या मध्यरात्री आढळून आले. हा नेमका काय प्रकार आहे? कोणत्या उद्देशाने केला आहे? याबाबत वसमत तालुक्यातील महमंदपुरवाडी परिसरात तर्कवितर्क लढवले जात असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलिसांनी सदर साहित्य जप्त करून काही लोकांची चौकशी सुरू केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्चच्या मध्यरात्री वसमत तालुक्यातील महमंदपुरवाडी रस्त्याच्या मधोमध नक्षीकाम केलेला जुना कांस्य धातूचा तांब्या तसेच पूजेचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्या तांब्याला हळद-कुंकू लावलेले असल्याचेही दिसून आले. सोमवारी (दि.३०) सकाळी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे यांना देण्यात आली. त्यानंतर निरदोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून संबंधित तांब्या व पूजेचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

हेदेखील वाचा : Kolhapur Crime: 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

दरम्यान, हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा शोध पोलिस घेत असून, परिसरातील काही व्यक्तींची चौकशी केली आहे. भररस्त्यात अशा प्रकारे साहित्य ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, याचाही तपास केला जात आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका : निरदोडे

नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये. याप्रकारणी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, संबंधितांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे कुणी घाबरून जावू नये, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी केले आहे.

हेदेखील वाचा : Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

Web Title: Ghastly act in hingoli bronze pitchers worshipped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Hingoli News

संबंधित बातम्या

ऑनलाईन बैठका अन् झेंडामंत्री; कथित व्हिडिओ प्रकरणामुळे हिंगोलीचे पालकमंत्री झिरवाळविरोधात नागरिक आक्रमक
1

ऑनलाईन बैठका अन् झेंडामंत्री; कथित व्हिडिओ प्रकरणामुळे हिंगोलीचे पालकमंत्री झिरवाळविरोधात नागरिक आक्रमक

Maharashtra News : गोरगरिब धान्यापासून वंचित; मार्च संपत आला तरी रेशनदुकानांमध्ये धान्याचा पुरवठा नाही
2

Maharashtra News : गोरगरिब धान्यापासून वंचित; मार्च संपत आला तरी रेशनदुकानांमध्ये धान्याचा पुरवठा नाही

धरणे भरले तरीही हिंगोलीत पाणीटंचाईचे सावट; थकबाकीमुळे शहरांचा पाणीपुरवठा धोक्यात
3

धरणे भरले तरीही हिंगोलीत पाणीटंचाईचे सावट; थकबाकीमुळे शहरांचा पाणीपुरवठा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.