Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…

आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2025 | 07:39 PM
Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तिथे अडकलेल्या 171 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सर्व सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरीत एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आणि संबंधित यंत्रणेने दिली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांतील सर्व पर्यटक प्रवासी सुखरूप आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये काल दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. तसेच परिसरातील रस्ते देखील पुर्ववत सुरू करून त्याद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय टम्टा यांची देखील मंत्री महाजन यांनी भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री  महाजन यांनी सांगितले.

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात एकूण 172 पर्यटकांपैकी 147 पर्यटक (67 मातली, 6 जॉली ग्रॅन्ट तसेच 74 उत्तरकाशी) येथे सुखरुप आहेत. सुरक्षित असलेल्या पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील वाटचाल सुरु केली आहे. 24 पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन ITBP Camp Matali येथे हलविण्यात येणार आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्र हे SEOC उत्तराखंड, जिल्हा नियंत्रण कक्ष, DEOC उत्तरकाशी, आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC) नवी दिल्ली यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मदत कार्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने त्यासंबंधी उपाययोजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत.

संचालक (आपत्ती व्यवस्थापन) उत्तराखंड यांचेकडून संचालक (आपत्ती व्यवस्थापन) मंत्रालय, मुंबई यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार बचाव कार्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

24 पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असुन त्यांना एअर लिफ्ट करुन ITBP Camp Matali येथे हलविण्यात येणार आहे. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅड यांचे दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम 30 यात्रेकरूंना संरक्षण देणार आहे. लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथक धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. NERC नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून त्यांचे स्थलांतर अपेक्षित आहे.

उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी राजीव स्वरूप, IGP यांच्याद्वारे उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरविण्यासाठी कार्यरत आहे.

Web Title: Girish mahajan contact with maharashtra tourist in uttarkashi cloudburst in uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • girish mahajan
  • Indian Tourist
  • Uttarakashi
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Girish Mahajan : “मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाही..; पूरग्रस्तांनी मदतीची मागणी करताच गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत
1

Girish Mahajan : “मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाही..; पूरग्रस्तांनी मदतीची मागणी करताच गिरीश महाजनांचे वक्तव्य चर्चेत

IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…
2

IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…

Girish Mahajan News: जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल; गिरीश महाजनांचे सूचक विधान
3

Girish Mahajan News: जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल; गिरीश महाजनांचे सूचक विधान

Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत
4

Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.