Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahda Constituency: धुर्त शक्तीचे आक्रमण रोखण्यासाठी मताधिक्य द्या; रणजीत शिंदेंचे माढा वासियांना आवाहन

कोणत्याही भूलथापांना बळी न पडता किंवा खोट्या प्रचाराच्या आहारी न जाता रणजीत शिंदे यांच्या सफरचंद चित्रा पुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आव्हान दादांनी यावेळी पुन्हा केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 16, 2024 | 04:13 PM
Mahda Constituency:  धुर्त शक्तीचे आक्रमण रोखण्यासाठी मताधिक्य द्या; रणजीत शिंदेंचे माढा वासियांना आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

टेंभूर्णी:  माढा तालुक्याची अस्मिता आणि स्वाभिमान भक्कम ठेवण्यासाठी आणि या तालुक्यावर दुष्ट धूर्त आणि लबाड शक्तीचे अतिक्रमण रोखण्यासाठी व या तालुक्यात सुख समाधान आणि वैभव निर्माण झालेले सध्याच्या काळातील अस्तित्व उध्वस्त करण्यासाठी टपलेल्या बाहेरच्या पोकळ, खोटारडा मोठेपणा दाखवणार्या दडपशाही शक्तीला रोखण्यासाठी आपला एकसंघ पणा दाखवून या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य द्यावे असे आव्हान माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांनी लऊळ येथील जाहीर सभेत बोलताना केले.

ते पुढे म्हणाले की वीस वर्षाच्या सीना माढा सिंचन योजनेचे पुनर्जीवित करण्याची आता वेळ आली आहे, यासाठी 300 कोटीचा प्रस्ताव दादांनी यापूर्वीच शासनाकडे पाठवलेला आहे. यामुळे या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे .या योजनेखाली तालुक्यातील 55 हजार क्षेत्र ओलिताखाली येत असून वेळेवर चालू झालेली व व्यवस्थित चाललेली महाराष्ट्रातील ही एकमेव सिंचन संस्था आहे. यापुढे मानेगाव उपसा सिंचन योजना तयार होऊन या तालुक्यातील ९०ते९५ टक्के क्षेत्र बागायती होणार आहे व संपूर्ण तालुक्याचा कायापालट होणार आहे. याचबरोबर दादांनी सर्वांना बरोबर घेऊन पंढरपूर तालुक्यातील 42 गावे व माळशिरस तालुक्यातील 14 गावे यांच्या सुद्धा तेथील गरजा ओळखून कोट्यावधी रुपयाचा मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला असल्यामुळे आज सर्व थरातून माझ्या उमेदवारीचे समर्थन होऊन मला भक्कम पाठिंबा मिळत आहे. या पुढे देखील निरंतर विकासाचा प्रवाह भविष्यकाळात कायम चालूच राहणार आहे याची मी विश्वासाने हमी देतो.

शरद पवार न्युज :  ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे मारणारे खुलं पत्र

तालुक्याचा कायापालट करून इतिहास घडवला- बबन शिंदे

या प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, ‘मी या तालुक्यांमध्ये धवल क्रांती हरितक्रांती कृषी औद्योगिक क्रांती साखर कारखानदारी सिंचन योजना एमआयडीसी विजेची सबस्टेशन्स, रस्ते, शैक्षणिक व आरोग्य सुविधा इत्यादी अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या आहेत त्यामुळे मी या तालुक्यात एक इतिहास घडवला आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. यामुळेच जनतेने जाणीव ठेवून त्यांचेकडून मिळत असलेले प्रेम आज या विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता किंवा खोट्या प्रचाराच्या आहारी न जाता रणजीत शिंदे यांच्या सफरचंद चित्रा पुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आव्हान दादांनी यावेळी पुन्हा केले.

प्रियंका गांधी न्युज: महाराष्ट्राच्या प्रचारात प्रियांका गांधींची दमदार एन्ट्री; शिर्डीतील सभेतून महायुतीविरोधात फुंकले रणशिंग

तालुक्याची अस्मिता व स्वाभिमान टिकवण्यासाठी पाठिंबा दिला- शिवाजी सावंत

याप्रसंगी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख प्रा. शिवाजी सावंत म्हणाले की,  आपण देशाचा स्वाभिमान बाळगतो त्याप्रमाणे तालुक्याचा स्वाभिमान बाळगा मी  तीस वर्षे दादांचा विरोधक होतो परंतु आमचे वैचारिक व राजकीय मतभेद होते परंतु आमच्यात वैयक्तिक मनभेद कधी झाले नाहीत व म्हणून तालुका एकसंघ ठेवण्यासाठी व बाहेरील शक्तीला वाकड्या नजरेने पाहू न देण्यासाठी मी व माझ्या हजारो कार्यकर्त्यांनी रणजीत शिंदे च्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रणजीत शिंदे यांचा विजय झालेला आहे, ते आमदार झालेले आहेत तुम्ही काळजीपूर्वक मतदान करा व 23 तारखेला गुलाल तयार ठेवा.
याप्रसंगी शिवाजी कांबळे संजय पाटील भिमानगरकर प्रताप नलवडे राजेंद्र भोंग दत्ताभाऊ म्हस्के प्रकाश नवगिरे परमेश्वर हळवनकर आदी मान्यवरांनी आपले प्रभावी विचार व्यक्त केले व रणजीत शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी प्रहार संघटना शेतकरी संघटना लऊळ वडार संघटना शिवसेना उबाठा संघटना तसेच ओबीसी संघटना व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देऊन रणजीत बबनराव शिंदे यांना विक्रीने मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही निकराने प्रयत्न करू असे आश्वासित केले.

याप्रसंगी नितीन बागल मौलाचाचा पठाण शंभू मोरे संतोष अनभुले पप्पू भोंग प्रभाकर भोंग सुरेश बागल खंडूआप्पा नलवडे दत्ता मस्के बापू गरड सरपंच पवन भोंग भारत नलवडे दिगंबर माळी पंडितराव साळुंखे सिद्धेश्वर घुगे मारुती चव्हाण स्वप्निल जानराव रमेश पाटील रसूल पठाण बाबाराजे जगताप तुकाराम शिरतोडे वसंत नलावडे यांचे सह लवूळ परिसरातील दहा ते बारा खेड्यातील हजारो नागरिक प्रचार सभेला उपस्थित होते.

Web Title: Give more votes to prevent the invasion of dhurta shakti appeals to madha residents of ranjit shinde nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 04:13 PM

Topics:  

  • Madha
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ
1

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
2

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन

Crime News Updates : माढ्यात वाळू माफियांची गुंडगिरी, तहसीलदाराला मारण्याचा प्रयत्न
3

Crime News Updates : माढ्यात वाळू माफियांची गुंडगिरी, तहसीलदाराला मारण्याचा प्रयत्न

Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी
4

Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.