मविआचं सरकार आलं तर रोहित पवारांना मिळणार ही जबाबदारी: शरद पवारांनी कर्जतच्या सभेत जाहीरच करून टाकलं
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून नेत्यांमध्य आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये ही प्रमुख लढत होत असून यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांवर आश्वासनांचा पाऊस आणि वचनांची सरबत्ती सुरु आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार हे देखील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आता शरद पवार यांनी जनतेला व मतदारांना साद घातली आहे. पत्र लिहून शरद पवार यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
काय आहे पत्रात?
शरद पवार यांच्या पत्राची सुरुवात माझ्या स्वाभिमानी मतदार बंधू भगिनींनो…अशी पत्राची सुरुवात आहे. पुढे पत्रामध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्र देशातील एक सुसंस्कृत, पुरोगामी, कणखर आणि स्वाभिमानी राज्य! महाराष्ट्र म्हणजे केवळ देशाला दिशा दालवणारे राज्य नव्हे तर देश संकटात असताना मदतीला धावून जाणारे राज्य आहे. मग तो पानीपतचा रणसंग्राम असो की 1877 चा स्वातंत्र्यसंग्राम! ‘महाराष्ट्रा बिना राष्ट्रगाडा न चाले। असे म्हटले जाते पण सध्याचे चित्र पाहिले तर महायुती सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचते आहे.
धर्माच्या नावाखाली मनुवादाला जवळ करून जाती-पातींमध्ये विष पसरवणे, दंगे-धोपे घडवून दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे हाच महायुती सरकारचा उद्योग आहे. अठरापगड जाती-पातींना सोबत घेणारे, सर्व धर्माचा सन्मान करणारे शिवरायांचे हिंदूत्व आणि शाहू-फुले-आंबेडकरांचे पुरोगामित्व त्यांना मान्य नाही. मागील वर्षी भाजपाप्रणित जातीयवादी शक्तींनी भारतरल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना बदलण्याची वल्गना केली पण लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांना जागेवर आणले. आता वेळ आली आहे या शक्ती समूळ नष्ट करण्याची,
महायुती सरकारने पुरोगामी विचारांच्या महापुरुषांचा अपमान करण्याचा विडा उचलला आहे. यांच्या कार्यकाळात राज्यपालांसारख्या संविधानिक पदावरील व्यक्तीने सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांच्या वैवाहिक जीवनाची खिल्ली उडवली होती हे आपण विसरता कामा नये, या सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा विटंबना केली. मालवणच्या समुद्र किनारी शिवछत्रपतींचा तो कोसळलेला, निश्चल-भग्न पुतळा पाहून उभा महाराष्ट्र हळहळला आहे. महायुतीला सत्तास्थानावरुन खाली खेचून याचा जाब विचारायचा आहे. त्यासाठी मला आपली साथ हवी.
नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा? माझ्या नादी लागू नका…मलिकांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
आपला महाराष्ट्र देशाचा राज्यकोष पोसणारे राज्य आहे. देशाच्या तिजोरीत जमा झालेल्या एकूण जी.एस.टी. करसंकलनापैकी 20 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. देशाच्या आयकर व इतर प्रत्यक्ष करसंकलनात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्के आहे. परंतू केंद्र सरकार देश पोसणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. कराच्या रूपाने महाराष्ट्रानी लूट होत असताना राज्यावरील कर्जाचा डोंगर ८ लक्ष कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. हे दळभद्री सरकार राहिलं तर कोणत्याही लाडक्या योजनेला द्यायला राज्याच्या तिजोरीत छदाम शिल्लक राहणार नाही, तेव्हा ते खाली खेचावे लागेल.
महाराष्ट्रात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. आपल्या राज्यातून वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, औषधनिर्मिती पार्क, हिंजवडीतील 27 आय.टी. कंपन्या यांसारखे मोठे उद्योग बाहेर गेल्यामुळे लाखोंचा रोजगार बुडाला आहे. केवळ उद्योगच नन्हे तर मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आय.एफ.एम.सी.), राष्ट्रीय मरीन पोलिस अकादमी या महत्त्वाच्या संस्था गुजरातला हलवण्यात आल्या आहेत. या महायुती सरकारच्या काळात स्पर्धा परिक्षांची वेळापत्रके कोलमडली, परिक्षांचे पेपर फुटले, नोकरभरती प्रक्रिया रखडल्या आणि शिष्यवृत्त्या बंद झाल्या आहेत. एकंदरीत महायुती सरकारने विद्यार्थ्यांचे तरुणांचे भवितव्य अक्षरशः देशोधडीला लावले आहे.
शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पिकांना हमीभाव मिळाला नाही, सोयाबीन, कापूस, ऊस, दूधाचे भाव गडगठले आणि तेल-बी-बियाणांचे भाव गगनाला भिडले, शेतीची अशी उकरटी अवस्था झाली आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. ती उठवण्यासाठी मला शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागले. निर्याद बंदी उठली पण त्याचा फायदा नियार्ददार कंपन्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि दुसरीकडे ग्राहकांना प्रचंड महागाईला सामोरे जावे लागत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, तेल, डाळी इतक्या महागल्या आहेत की, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडले आहे.
शिवछत्रपतींच्या रूपाने दिल्लीच्या मग्रूर तख्ताला आव्हान देणारा, देशाच्या संरक्षणासाठी पानिपतच्या रणभूमीमध्ये रक्त सांडलेला, संकटकात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री म्हणून धावून गेलेला, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राची महायुती सरकारने काय अवस्था… pic.twitter.com/6mgaFpOPM8
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 16, 2024
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. एक सत्ताधारी आमदार उल्हासनगर पोलिस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार करून एकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. दुसरा आमदार मुंबईमध्ये गणपती विसर्जनात गोळीबार करतो. आश्वर्य म्हणजे भाजपाचा एक आमदार सांगतो की, सागर बंगल्यावर बॉस बसलाय त्यामुळे माझं कुणीही वाकडे करू शकत नाही, असे सांगून ‘गुन्हेगारांना संरक्षण कुणाचे?’ याची त्याने पावतीच दिली आहे. बाबा सिद्दीकींसारख्या ज्येष्ठ आमदाराचा गोळ्या घालून खून होतो. बदलापूर, बोपदेव घाटात बलात्कार होतात, राज्यातून हजारो मुली-महिला बेपत्ता होतात, अंमली पदार्थाची तस्करी करणारे सरकारी आशीर्वादाने पलायन करतात आणि पोर्शे गाडी सुसाट वेगाने चालवून निरपराधांचा जीव घेणाऱ्यांची आमदार वकिली करतात. इतके भयावह चित्र राज्यात दिसत आहे.
महायुती सरकारच्या काळात कारभार बोकाळला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुंबईकडे येणारे काही टोल बंद केले, पण सरकारी कार्यालये आणि मंत्रालयाच्या वाटेवरचे टोल कधी नंद होणार ? हा खरा प्रश्न आहे. मंत्रालयाच्या अवतीभोवती अलीशान इमारतीत भ्रष्टाचाराची सुविधा केंद्रे सुरू आहेत. शिवछत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे सरकार मूठभर दलाल मंडळींच्या माध्यमातून मंत्रालयाचा कारभार पाहत आहेत. शाळेच्या गणवेश वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. राज्याच्या विकासासाठी कोणतेही दूरगामी धोरण नाही, नवीन योजना नाहीत. ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय।’ अशी अवस्था राज्यकारभाराची झाली आहे.