Ganesh Chaturthi 2024: आज दीड दिवसांच्या गणपतींच विसर्जन; समुद्रात उतरताना खबरदारी द्या, प्रशासनाचे आवाहन (फोटो सौजन्य - pinterest)
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं काल आगमन झालं. सर्वत्र धुमधडाक्यात आणि ढोल ताशांच्या गजरात गणपतींचे स्वागत करण्यात आले. आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भाविक निरोप देणार आहेत. मुंबईत प्रामुख्याने गिरगाव चौपटीला गणरायांचे विसर्जन केलं जाते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक चौपाटीवर दाखल होतात. आरती आणि प्रार्थनेनंतर आज दुपारी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होईल. यावेळी गिरगांव चौपाटीवर भाविकांचा जनसागर पाहायला मिळतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक चौपाटीवर दाखल होतात.
हेदेखील वाचा- Ganeshostav 2024 : मराठी कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन! पाहा काही खास फोटो
बाप्पाल निरोप देताना होणारी गर्दी आणि समुद्रातील मासे यांपासून भाविकांनी सावध राहावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने भाविकांना केलं आहे. मुंबईच्या समुद्रात मोठे मासे आहेत, ज्यामुळे गंभीर इजा होऊ शकते. याच पार्श्वभमीवर भाविकांनी विसर्जनावेळी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी आणि मोठ्या माशांपासून सावध राहावं, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
प्रशासनाने सांगितलं आहे की, आज दीड दिवसांच्या गणरायाला भाविक निरोप देणार आहेत. मुंबईकर गिरगावच्या समुद्रात गणरायाचे विसर्जन करतात. मात्र, समुद्रात उतरतांना गणेश भक्तांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण समुद्रात धोकादायक मासे चावे घेण्याची शक्यता असते. यामुळे भाविकांना गंभीर दुखापत होऊ शकते. मत्स्य विभागाच्या ट्रायल नेटिंगमध्ये हे मासे आढळले आहेत. समुद्रात या माशांची संख्या वाढली आहे. यासाठी विसर्जनावेळी समुद्रात उतरताना योग्य भाविकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2024: मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष, पाहा मुंबईतील गणपतींचे खास फोटो
मत्यस्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर आणि गिरगाव येथील चौपाट्यांवर मत्स्य व्यवसाय विभागाने प्रायोगिक मासेमारी केली. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाला प्रामुख्याने जेली फीश, ढोमी, कोळंबी, ब्लू जेली फिश, स्टिंग रे, शिंगटी, घोडा मासा, या सारखे धोकादायक मासे आढळले आहेत. हे मासे चावल्याने गंभीर दुखापत होऊ शकते. तसेच यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी समुद्रात उतरताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
तसेच भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन मुंबई महानगरपालिकेमार्फत नेमून देण्यात आलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करावे. विसर्जनच्या वेळी गमबूटचा वापर करावा. जेणेकरून समुद्रातील माशांपासून संरक्षण करता येईल. गेल्या वर्षी तब्बल तब्बल ६७ गणेश भक्तांना विसर्जनादरम्यान माशांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा गांभीर्याने विचार करता यंदा गणेश भक्तांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.