सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साह आणि आनंद आहे. फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे. रुपाली भोसले, शशांक केतकर, अंकिता लोखंडे, जुई गडकरी, सुयश टिळक, सुशांत शेलार या सगळ्या कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं.कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.
Ganeshostav 2024 : मराठी कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन! पाहा काही खास फोटो (फोटो सौजन्य - Instagram)
मराठी कलाकारांच्या घरी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेते सुबोध भावे यांनी देखील त्यांच्या राहत्या घरी गणरायाचं आगमन केलं आहे.
अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे बाप्पाचं आगमन झालं आहे.
अभिनेत्री जुई गडकरी हिने इंस्टाग्रामवर तिच्या घरात विराजमान झालेल्या बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री मिथिला पालकरच्या घरी बाप्पाचे स्वागत झाले आहे.