Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 04, 2022 | 02:31 PM
युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील –  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागत होती. परंतु आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.

[read_also content=”भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? – अमोल मिटकरी https://www.navarashtra.com/maharashtra/amol-mitkari-criticized-on-prasad-lad-over-his-controversial-statement-nrps-350719.html”]

औरंगाबाद येथील मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्टजेन च्या २५ परिणामकारक कथा’ या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (दि. ४) राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला सातारा येथील कवित्सु रोबोट्रॉनिकसचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ तसेच पुस्तकामध्ये नमूद केलेले नव्या पिढीतील युवा उद्योजक उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अश्या अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पुढे त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था केवळ ५ ट्रिलियन डॉलर इतकीच नाही १० ट्रिलियन डॉलर देखील होऊ शकते असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

राज्यातील दुसऱ्या पिढीतील व्यवसाय

उद्योगातील युवा उद्योजकांना शोधून पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखक दत्ता जोशी यांचे अभिनंदन केले. कौटुंबिक व्यवसायातील नव्या पिढीतील उद्योजकांच्या २५ परिणामकारक कथा असलेल्या दत्ता जोशी यांच्या पुस्तकाचे साहित्यमूल्य फार मोठे आहे. स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईल त्यावर्षी किमान २५००० युवा उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या जातील असा विश्वास मराठवाडा विभागाचे सीआयआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केला. लेखक दत्ता जोशी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आभार प्रदर्शन केले. ‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ या पुस्तकामध्ये जैन इरिगेशन समूहातील अभेद्य व अथांग जैन, यशप्रभा समूहाचे अमित घैसास, अभिजित डाइज अँड टूल्सचे निखिल व अभिजित नरेश राऊत, पितांबरी उत्पादने उद्योगाचे प्रतिक्षीत रवींद्र प्रभुदेसाई, यांसह मिहीर वैद्य, सुमित धूत, कपिल राठी, स्वराली सावे, कौस्तुभ फडतरे यांसह २५ उद्योजकांच्या यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

Web Title: Governor bhagat singh koshyari syas young entrepreneurs will make india the third economic power in the world nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 02:31 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.