Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दिलेलं वचन पाळा’; शिवसेनेच्या ‘या’ माजी खासदाराने भाजपला दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

कुणीही जातपडताळणी समितीला हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ मिळवेल आणि अन्यायग्रस्तांना दादही मागता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पुन्हा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेऊ शकतो, असेही अडसूळ म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2024 | 11:21 AM
तिकीट नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा

तिकीट नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांना भाजपकडून राज्यपाल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात न आल्याने अडसूळ यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल करण्याचे दिलेले वचन पाळावे. अन्यथा मी नवनीत राणा प्रकरणात न्यायालयात जाईल’, असे ते म्हणाले.

हेदेखील वाचा : ‘मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी, त्यांचा दिल्ली दौरा हा लाचारीचे एक उदाहरण’; संजय निरूपम यांची घणाघाती टीका

माजी खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अयोग्य असून, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (क्यूरेटिव्ह पिटीशन) दाखल करण्याचा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जातपडताळणी समितीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून नवनीत राणा यांना या प्रकरणात दिलासा दिला असला, तरी या निकालाचा देशावर काय परिणाम होईल, याचा विचार केलेला नाही.

हेदेखील वाचा : Big News ! 15 ऑगस्टनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार; ‘हे’ दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

कुणीही जातपडताळणी समितीला हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ मिळवेल आणि अन्यायग्रस्तांना दादही मागता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पुन्हा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेऊ शकतो, असेही अडसूळ म्हणाले.

15 दिवस वाट पाहणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. पण आश्वासन देऊन काहीही झाले नाही. काही गोष्टींसाठी मर्यादा असतात. त्यामुळे अजून पंधरा दिवस वाट पाहाणार. त्यानंतर मात्र आपण नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत हव्या 3 जागा

विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील तीन जागा मागून घेणार असल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले. त्यात बडनेरा, तिवसा आणि दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या जागांवर यापूर्वी शिवसेना लढली आहे.

Web Title: Governor do it otherwise will go to court in the navneet rana case anandrao adsul warning to bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 11:21 AM

Topics:  

  • Navneet Rana

संबंधित बातम्या

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
1

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.