Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझ्या आयुष्यात वाटले नव्हतं कधी गोल्डमेडल पाहायला मिळेल; ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे म्हणाला, ऑलिंपियाडमध्ये दुहेरी सुवर्णपदक…

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आयुष्यात कधी सुवर्ण कामगिरी पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. परंतु, या वेळेला दुहेरी सुवर्णकामगिरी केल्याचा दुर्मिळ योग पाहण्याचे माझ्या नशिबी आले. यामुळे या युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा मनापासून आनंद असल्याचे ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांनी सांगितले.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 28, 2024 | 09:31 PM
I never thought in my life that I would ever see a gold medal in the Olympiad The ecstasy of achieving double gold Grandmaster Abhijit Kunte

I never thought in my life that I would ever see a gold medal in the Olympiad The ecstasy of achieving double gold Grandmaster Abhijit Kunte

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांनी ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी सुवर्ण कामगिरी केल्याचा अत्यानंद असल्याचे सांगत युवा खेळाडूंचे कौतुक केले. एकेकाळी आम्ही खेळत असताना म्हणजे तब्बल 26 वर्षांपूर्वी आम्ही ऑलिम्पियाडमध्ये खेळताना दुसऱ्या देशातील खेळाडूंच्या सह्या घेण्यासाठी पळायचो. परंतु, आताचा भारत पाहिला तर अभिमान वाटतोय, की परदेशी नागरिक आपला गुकेश आणि दिव्या देशमुखच्या सह्या घेण्यासाठी गर्दी करीत होते.

युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीचा मोठा वाटा
बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी जे यश मिळवले त्यामध्ये युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीचा मोठा वाटा आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असे सांगून कुंटे म्हणाले, आणखी दहा-बारा वर्षे तरी भारतीय संघाचे जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात वर्चस्व राहील अशी मला खात्री आहे. महिला संघातील खेळाडू दिव्या देशमुख ही खऱ्या अर्थाने दिव्यत्व लाभलेली खेळाडू आहे. मी तिला अकरा फेऱ्यांमध्ये तुला खेळायचेच आहे असे सांगितले होते आणि तिने हा विश्वास सार्थ ठरवीत संघास सुवर्णपदक जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेच्या वेळी डी. गुकेश, विदित व दिव्या यांच्या सह्या आणि छायाचित्रे घेण्यासाठी अनेकजण गर्दी करीत होते यावरूनच या खेळाडूंनी लोकप्रियता मिळवली होती आहे याचा प्रत्यय येतो.

महाराष्ट्र चेस असोसिएशनकडून मानधन

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे विदित गुजराती व दिव्या देशमुख यांना प्रत्येकी तीन लाख रुपये तर ग्रॅण्ड मास्टर अभिजीत कुंटे व सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅण्ड मास्टर संकल्प गुप्ता यांना दीड लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. दोघांचाही पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल तसेच पीवायसी जिमखानाचे सह सचिव सारंग लागु, आमोद प्रधान यांच्यातर्फे देखील सत्कार करण्यात आला.

सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो

बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत आहे असे ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने येथे सांगितले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या विदित गुजराथी व महिला संघाचे प्रशिक्षक अभिजीत कुंटे यांचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या मान्यवरांची उपस्थिती

या समारंभास महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, मानद सचिव निरंजन गोडबोले, खजिनदार विलास म्हात्रे तसेच वरिष्ठ पदाधिकारी फारुख शेख हे उपस्थित होते. महिला संघातील सुवर्णपदक विजेती दिव्या देशमुख व सहाय्यक प्रशिक्षक संकल्प गुप्ता हे या समारंभास काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा ऑनलाईन पद्धतीने गौरव करण्यात आला.‌

बुद्धिबळ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक

बुद्धिबळ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले यावर अजूनही विश्वास बसत नाही मात्र गेली अनेक वर्षांची तपस्या आणि त्याग याचेच हे फलित आहे असे सांगून विदित म्हणाला,” माझ्या या यशामध्ये माझ्या पालकांनी जो त्याग केला आहे त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. लहानपणी नाशिक येथे मी सात आठ वर्षांचा असताना अभिजीत कुंटे याच्याबरोबर डाव खेळण्याची संधी मला मिळाली आणि तेव्हापासूनच आमच्यामध्ये गुरु शिष्यांचे नाते तयार झाले आहे. अभिजीत दादामुळे मी घडलो असे मी अभिमानाने सांगेन.‌ चेस ऑलिंपिक मध्ये आमच्याबरोबरच महिला संघांनी जे काही सोनेरी यश मिळवले ते अतिशय कौतुकास्पद आहे कारण दोन फेऱ्यांमधील खराब कामगिरी नंतर त्यांनी जे काही पुनरागमन केले ते खरोखरीच अतुलनीय आहे. “

Web Title: Grandmaster abhijit kunte said i never thought in my life that i would ever see a gold medal in olympiad the ecstasy of achieving double gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 08:39 PM

Topics:  

  • Chess Olympiad 2024
  • gold medal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.