ग्राहकांसाठी खुशखबर! देशभरात वाढले अन्नधान्याचे उत्पादन; अन्नधान्याच्या दरात झाली घट, पहा दर...
पुणे : यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्यामुळे देशभरात अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, डाळी आणि कडधान्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना नैसर्गिकरित्या साठवलेले, रसायनमुक्त आणि शुद्ध सात्त्विक अन्नधान्य वर्षभरासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी ग्राहक नवीन हंगामातील धान्य वर्षभरासाठी साठवून ठेवत.
मात्र, बदलत्या काळात गरजेप्रमाणे खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, व्यापाऱ्यांना अन्नधान्य दीर्घकाळ साठवावे लागते, आणि त्यासाठी कीटकनाशके वापरण्याची गरज निर्माण होते. नैसर्गिकरित्या साठवलेले धान्य आणि डाळी शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
तांदूळ आणि गव्हाच्या दरात मोठी घट
यंदा तांदळाचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून, बासमती वगळता इतर सर्व तांदळाचे दर कमी झाले आहेत. तसेच, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून, त्याचाही दर कमी आहे. सध्या अन्नधान्याचा पुरवठा मुबलक असला तरी हळूहळू साठा कमी होत जाईल आणि दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणींनी या संधीचा लाभ घेत वर्षभरासाठी गहू तांदूळ, ज्वारी , डाळी, साबुदाणा, शेंगदाणे यांची खरेदी करून ठेवावी, असे मत राजेंद्रकुमार मोहनलाल कंपनी मार्केट यार्ड (आर.एम. फूड मार्ट) चे यश बाठिया यांनी व्यक्त केले.
80 कोटी लोकांना मोफत धान्य, मग कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा भाजपला सवाल
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात 80 कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 76.32% आणि शहरी भागात 45.34% लोकसंख्या लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग 11 वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.