महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवारांनी दिला मोलाचा सल्ला (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या वाढत्या प्रकरणांमुळे लोक खूप घाबरले आहेत. दरम्यान, वाढत्या प्रकरणांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आणि कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, लोकांनी त्यांचे अन्न, विशेषतः चिकन, पूर्णपणे शिजवावे.
सध्या या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस पसरत चालले असून पुण्यात सुरू झालेले हे प्रकरण आता महाराष्ट्रच्या विविध भागात पोहचले आहे आणि म्हणूनच आधीपासून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यासाठीच महत्त्वाची सूचना केली असल्याचे दिसून आले आहे. काय म्हणाले अजित पवार जाणून घ्या
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की या आजाराबाबत कुक्कुटपालनाशी संबंधित चिंता दूर केल्या पाहिजेत आणि कोंबड्यांना मारण्याची गरज नाही. “अलीकडेच खडकवासला धरण परिसरात (पुणे) जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत,” असे ते म्हणाले. काही तज्ञांनी याचा संबंध पाण्याच्या दूषिततेशी जोडला, तर काहींनी हा आजार चिकन खाल्ल्याने झाल्याचे म्हटले. सखोल तपासणीनंतर, असा निष्कर्ष काढण्यात आला की कोंबड्यांना मारण्याची गरज नाही.”
Mumbai GBS News: मुंबईकरांनो सावधान! जीबीएसचा पहिला मृत्यू, राज्यात GBS मुळे 8 रुग्णांचा मृत्यू
जीबीएस कसा पसरतो?
जीबीएस संसर्ग दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकतो, विशेषतः ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ या जीवाणूंनी संक्रमित अन्नामुळे. आरोग्य तज्ञांच्या मते, हे बॅक्टेरिया कमी शिजवलेल्या चिकनमध्ये आढळू शकतात, ज्यामुळे हा संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते.
राज्यात जीबीएसचे वाढते रुग्ण
महाराष्ट्रात सर्वाधिक जीबीएस प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, शनिवारी (१५ फेब्रुवारी) या आजाराचा एक नवीन रुग्ण आढळून आला, ज्यामुळे राज्यातील संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २०८ झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला स्वच्छतेची काळजी घेण्याचे आणि योग्य प्रकारे शिजवूनच अन्न सेवन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “डॉक्टर असेही सल्ला देतात की अन्न नीट शिजवले पाहिजे. सध्या, जीबीएसची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार आणि आरोग्य विभाग या आजारावर सतत लक्ष ठेवून आहेत आणि संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहेत. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणेही तितकीच आवश्यक आहे. हा आजार सध्या जास्त पसरत असून वेळीच आपल्या अन्नातून चिकन कशा पद्धतीने खाल्ले जात आहे ते पहावे आणि शक्य असल्यास चिकन खाणे टाळावे जे अधिक सोयीचे ठरेल असे अनेक डॉक्टरांनी सुचवले आहे.