महाराष्ट्रात GBS पूर्णपणे नियंत्रणात- जे. पी. नड्डा (फोटो- टीम नवराष्ट्र)
Maharashtra GBS Update: महाराष्ट्रात विशेष करून पुणे शहरात जीबीएस रुगाणची संख्या वाढत आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच राज्यात या आजारांवर लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदीसाह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या, यामध्ये ज्या ठिकाणी जी बी एस रुग्ण संख्या वाढत आहेत त्या भागात प्रत्यक्ष पहाणी करण्यात यावी, कुकुट पालन व्यावसाय असलेल्या परिसराला भेटी द्याव्यात. पाणी पुरवठा आणि शुद्धीकरण विभागाने विशेष जलशुद्धीकरण मोहीम राबवावी, ज्या ठिकाणी पाईप लाइन दुरुस्तीची गरज असेल तिथे ती तत्काल करण्यात यावी, तसेच मागील दोन महिन्यातील पाणी पुरवठा आणि आरोग्य विषयक बाबींचा आढावा घ्यावा असे निर्देश प्रशासनाला दिले.
तसेच सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या एसओपीचे पालन करावे असे सांगत रुग्णांना फिजिओ थेरेपी सोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ला देण्याच्या सूचना जे पी नड्डा यांनी दिल्या. बैठकीबद्दल माहिती देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील जी बी एस रुगाणबद्दलची इत्यंभूत माहिती आम्ही केंद्र सरकारला दिली आहे. राज्यातील जीबीएस परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून पुणे महानगर पालिका आणि राज्य सरकार समन्वय साधून ह्या साठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत.
हेही वाचा: दिलासादायक ! पुण्यात GBS आजाराचा नवीन रुग्ण नाही; आरोग्य विभागाकडून माहिती
पुण्यात GBS आजाराचा नवीन रुग्ण नाही
राज्यातील ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात ही रुग्णसंख्या 127 वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरात दोन-तीन दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात शहरात गुरुवारी जीबीएसची लागण झालेला एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, बुधवारी या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या दोनवर पोचली आहे.
हेही वाचा: GBS Pune Update: ‘पाहणी करायला आला आहात आणि…’; गावकऱ्यांचा केंद्रीय पथकावर आरोप
ससून सर्वोपचार रुग्णालयात 56 वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यात मृत्यू झालेला हा दुसरा रुग्ण ठरला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जीबीएसच्या रुग्णांची संख्या 111 होती. यात रात्री उशिरापर्यंत वाढ झाली. ती 130 पर्यंत पोचली आहे. यामुळे चिंता निर्माण झाली होती. गुरुवारी मात्र एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील 130 संशयित रुग्णांपैकी 73 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.