जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे (Jalgaon District) पालकमंत्री पद (Gardian Minister) रखडले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण होणार ? या बद्दल जळगाव वासियांच्या मनामध्ये उत्सुकता होती.
अनेक जण याविषयी तर्कवितर्क ही लढवत होते. मात्र या सर्व चर्चांना आता विराम मिळाला असून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची यांची नियुक्ती झाली आहे.