Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : संप्रदायामध्ये समन्वय असणे काळाची गरज! शांतीनगर येथील विचार मंथन संमेलनात विचारवंतांनी दिला संदेश

कारंजा (लाड) येथील शांतीनगरमध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या विचार मंथन संमेलनात संप्रदायांमध्ये समन्वयाची गरज अधोरेखित झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 19, 2026 | 07:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कारंजा (लाड) येथे शांतीनगरमध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित समन्वयक विचार मंथन संमेलनात विविध संप्रदायांमध्ये समन्वय असणे ही काळाची गरज असल्याचा एकमुखी सूर व्यक्त करण्यात आला. नाथ, दत्त आणि वारकरी अशा विविध संप्रदायांची उपासना पद्धती, तत्त्वज्ञान आणि विचारधारा भिन्न असली तरी त्यांचा अंतिम उद्देश मानवतेचे कल्याण हाच असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.

Maharashtra Politics: “… त्या पुरावेही नष्ट करू शकतात”; Ashok Kharat केसमध्ये चाकणकरांवर ठोंबरेंचे आरोप

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ बेरूळकर गुरुजी होते, तर उद्घाटन पद्मश्री जनार्दन बोथे गुरुजी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नारायण महाराज शिंदे, डॉ. तुकाराम महाराज गरुड, मीराबाई गरुड, विठ्ठलराव कातोळे महाराज, कीर्तनसम्राट लक्ष्मणराव काळे महाराज, नामदेवराव गव्हाळे, अरुणभाऊ सालोडकर आणि संकेत महाराज काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी ‘गुरुपरंपरा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या विषयावर बोलताना डॉ. तुकाराम महाराज गरुड यांनी अध्यात्म क्षेत्रात गुरुपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. गुरूच्या माध्यमातूनच शुद्ध व पवित्र ज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञान व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो, असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात ‘आदर्श समाज जीवन व संत विचारांचे योगदान’ या विषयावर बोलताना कीर्तनसम्राट लक्ष्मणराव काळे महाराज यांनी समाजाला दिशा देण्यासाठी संत आणि कीर्तनकारांचे विचार महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. मात्र, उपदेश करणाऱ्यांनी आपल्या आचार-विचारात पारदर्शकता ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Nashik Crime : खरातच्या ‘विळख्यात’ सुशिक्षित कुटुंब; ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली अबलेवर अडीच वर्षे अत्याचार

तिसऱ्या सत्रात आचार्य हरिभाऊ बेरूळकर गुरुजी यांनी ‘अध्यात्म आणि समाज जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यात्म आणि धार्मिकता यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, धार्मिकता ही बाह्य स्वरूपावर आधारित असते, तर अध्यात्म माणसाला अंतर्मुख करून त्याच्या आचार-विचारात शुद्धता आणते. अध्यात्म हे केवळ पूजा-अर्चा नसून माणसाला खऱ्या अर्थाने घडवणारे शास्त्र आहे, असे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी मीराबाई गरुड, नारायण महाराज गव्हाळे, विठ्ठलराव कातोळे, अरुणभाऊ सालोडकर आणि संकेत महाराज काळे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन मनोज चौबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा सेवा अधिकारी सुनील देशमुखे यांनी केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने गुरुदेव प्रेमी उपस्थित होते.

Web Title: Harmony among religious sects is the need of the hour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 07:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.