Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Dudh Sangh Politics: गोकुळच्या राजकारणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष; आमदार शिवाजी पाटलांचे मुश्रीफांना आव्हान 

गोकुळ प्रकरणावर बोलताना मुश्रीफ यांनी थेट भूमिका घेतली. “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच शिवाजी पाटील यांना उत्तर देईन,” असा इशारा त्यांनी दिला. त

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 02, 2026 | 02:03 PM
Gokul Dudh Sangh, Hasan Mushrif vs Shivaji Patil Kolhapur, Gokul Dairy Corruption Allegations, Kolhapur District Politics May 2026

Gokul Dudh Sangh, Hasan Mushrif vs Shivaji Patil Kolhapur, Gokul Dairy Corruption Allegations, Kolhapur District Politics May 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • गोकुळ दूध संघामध्ये ३ हजार नवीन संस्थांना दिलेली बेकायदेशीर मंजुरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप
  • गोकुळचा निकाल लागल्यावरच बोलू” असे म्हणत त्यांनी आपली रणनीती स्पष्आ
  • आमदार शिवाजी पाटील हे गोकुळवर प्रशासक नेमण्याची मागणी
Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. गोकुळच्या राजकारणावरून चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वाद उफाळून आला आहे. दोन्ही नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू झाल्या आहेत.  गोकुळच्या निवडणुकीनंतर  आपण या सर्व प्रकारावर भाष्य करु, अशी प्रतिक्रीया हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्याचवेळी आमदार शिवाजी पाटील यांचेदेखील त्यांनी आभार मानले आहेत.
राज्यातील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी आपली ठाम भूमिका मांडली. “गेली ४० वर्षे मला सामाजिक आणि राजकीय अनुभव आहे. सहा वेळा निवडून आलो असून २५ वर्षे मंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांना माझी भूमिका माहिती आहे. कोण काय बोलते, याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Gas चा भडका! कमर्शियलनंतर आता घरगुती Cylinder च्या दरात मोठी वाढ होणार? जाणून घ्या किती बसणार फटका

‘गोकुळ’ निकालानंतरच उत्तर देणार

गोकुळ प्रकरणावर बोलताना मुश्रीफ यांनी थेट भूमिका घेतली. “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच शिवाजी पाटील यांना उत्तर देईन,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल,” असेही त्यांनी सांगितले. तसेच, “मी शिवाजी पाटील यांचा आभारी आहे की त्यांनी मला रिकामे केले. मी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, मी महायुतीचा घटक आणि मंत्री आहे. मात्र, सध्या कोण काय बोलत आहे, याची मला पर्वा नाही. गोकुळच्या मुद्द्यावर योग्य वेळीच उत्तर देईन.”

महायुतीबाबत ठाम; अजित पवारांवर विश्वास

महायुतीतील भूमिकेबाबत बोलताना त्यांनी दिवंगत अजित पवार  यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “अजितदादांनी मोठा विचार करून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युगेंद्र पवार  यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही. आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि तसेच राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत. ४२ आमदार आणि खासदार असताना चुकीची वक्तव्य करणे योग्य नाही,” असेही ते म्हणाले.
Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

भोर अत्याचार प्रकरणावर संताप

भोर येथील अत्याचाराच्या घटनेवर बोलताना मुश्रीफ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ही अत्यंत गंभीर घटना आहे. ६५ वर्षांच्या आरोपीने केलेल्या कृत्यासाठी त्याला फाशीची शिक्षा व्हावी. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक कायदे आणि मोठ्या सुधारणा आवश्यक आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकूणच, हसन मुश्रीफ यांनी गोकुळ प्रकरण, महायुतीतील भूमिका आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडत राजकीय वातावरण तापवले आहे.

Web Title: Hasan mushrif vs shivaji patil kolhapur gokul dairy corruption allegations kolhapur district politics may 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.