He went for a morning walk! Youth dies after being swept away by Sipna river bridge
धारणी : सिपना नदीला (Sipna river) आलेल्या पुरात मॉर्निंग वॉकला (Morning walk) गेलेला युवक पुलावरून वाहून गेला. दिया गावातून धारण चहूकडे मॉर्निंग वॉकला गेलेला युवक वाहून गेल्याची (Carried away by youth) घटना रविवारी (१० जुलै) सकाळी घडली. शांतीलाल लखन कास्देकर वय (३०) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. पाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा प्रशासनाकडून शोध घेतल्या जात आहे.
दोन दिवसांपासून मेळघाटात तूरळक पाऊस सुरू आहे. चिखलदऱ्याच्या पायथ्याशी जंगलात मुसळधार पाऊस पडल्याने सिपना नदीला पूर आला. त्या दरम्यान शांतीलाल लखन कास्देकर हा युवक पूलावरून शांतपणे जात होता. अचानक पुराचा लोंढा आल्याने त्यात शांतीलाल वाहून गेला. गत अनेक वर्षांपासून बैरागढ रस्त्यांची दुराववस्था झाली आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन बैरागढ रस्तावर प्रवास करीत असल्याचे विदारक चित्र येथे निर्माण झाले आहे. सिपना नदीचा पुल धोकादायक झाला आहे. पुलाला कवठे नसल्याने हा युवक वाहून गेला असल्याचा आरोप शांतीलालच्या नातेवाईकांनी केला आहे.