Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्र तापला! ‘या’ भागात पारा 45 अंशाच्या पुढे, कोणत्या जिल्ह्यांत हायअलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2025 | 05:30 PM
Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्र तापला! 'या' भागात पारा 45 अंशाच्या पुढे, कोणत्या जिल्ह्यांत हायअलर्ट

Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्र तापला! 'या' भागात पारा 45 अंशाच्या पुढे, कोणत्या जिल्ह्यांत हायअलर्ट

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोचले आहे.

45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढणार
उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढले आहे. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरातील तापमान 40 अंशाच्यावर गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

यंदाच्या मोसमातील 44.2 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी तापमान अकोल्यात नोंदवण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घ्यावी.

दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मुंबई महानगरातही कमालीचा उकाडा जाणवत आहे. ठाण्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहिला मिळाले. तर मुंबईचा पारा 33.8 अन् पालघरमध्ये 36 अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे.

Maharashtra Weather Forecast: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ, कसे राहणार हवामान? पहाच…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळरत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा पाऊस, गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे.  ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन te तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Web Title: Heat wave in maharashtra 45 degrees temperature in bhusaval weather update in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Heat Wave in Maharashtra
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Weather Alert : सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; महाबळेश्वर-जावळीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ
1

Weather Alert : सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; महाबळेश्वर-जावळीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.