राज्याला अवकाळी पावसाचा इशारा (फोटो - istockphoto)
पुणे: गेले काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत आहे. तर काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. बदलत्या वातावरणाचा शेती, फळबागांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. काल पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपून काढले आहे.
राज्याकडे झेपावतेय अवकाळीचे मोठे संकट
हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळत आहे, कडक उन्हाळ्यात पाऊस आल्याने काही ठिकाणी थंडावा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस झाल्याने व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Forecast: राज्याकडे झेपावतेय अवकाळीचे मोठे संकट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट
अवकाळी पावसाचा आंबा, काजूच्या बागांना मोठा फटका
रत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा पाऊस, गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन te तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.