यंदाच्या हंगामात उन्हाचा पारा चांगलाच वर जात आहे. सध्या सरासरी 43 अंशांपर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये तर उन्हाचा कहरच पाहायला मिळत आहे.
जळगाव, गोंदिया, मुंबईत देखील तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ झाली आहे. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वाढ झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 अंशांच्या आसपास जाणार आहे.राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा चाळिशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मुंबईकराना रविवारीही घामाच्या धारा लागल्या. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील स्वयंचलित हवामान केंद्राने कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले, जे संपूर्ण राज्यात नोंदवले गेलेले सर्वोच्च तापमान आणि सामान्यपेक्षा 5.4 अंशांनी…