Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार; पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत, एका महिलेचा मृत्यू

शहरात झाडपडीच्या तब्बल ८२ घटना घडल्या आहेत. वानवडी, पुणे विद्यापीठ, बाणेर, औध, सिंहगड रोड, ताडीवाला रोड, कोरेगांव पार्कसह जवळपास शहरातील २१ भागात झाडपडीच्या या घटना घडल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 03, 2026 | 11:18 AM
Pune Rain Updates, Pune Rains Today, Pune Flood News, Pune Weather Update,

Pune Rain Updates, Pune Rains Today, Pune Flood News, Pune Weather Update,

Follow Us
Follow Us:
  • २६० ठिकाणी पाणी साचले तर ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना
  • सिंहगड रोडसह अनेक भागात गुडघाभर पाणी
  • सिंहगड रस्त्यावर झाड कोसळून फुलविक्रेत्या महिलेचा मृत्यू
 Pune Rain Update:  अवकाळी पावसाने गुरुवारी शहरात कहर केला. घरात पाणी शिरणे, झाडपडी, रस्त्यांवर पाणी तुंबणे, सीमा भिंत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. शहरात २६० ठिकाणी पाणी तुंबले तर ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. यात सिंहगड रस्त्यावर झाड पडल्याने एक महिला मृत्यूमुखी पडली. विशेषतः शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागात अति मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी झोडपले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या पावसाळापूर्व कामाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.

पुण्यातील प्रमुख रस्त्यासह काही भागाला नद्यांचे स्वरूप आले होते. अग्निशमन दल, पुणे पोलिस पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून साचलेले पाणी काढण्यासोबतच रस्त्यावरून झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक भागात नागरिकांनीच स्वतःहून रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, अनेक भागात वाहने पाण्यात अडकली गेली. वाहने मध्येच बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे काही रस्त्यांवर चार ते पाच फुट पाणी साचल्याने रस्ताच काही तास बंद ठेवण्याची वेळ आली. शहरातील केडवीनगर, सिंहगड रोड, बाणेर, बालाजीनगर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कोथरूड, धायरी, वाकड, हडपसर, वारजे, डंकेवाडी या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. कोंढवे धावडे भीमनगर येथील राधिका अपार्टमेंट (पार्किंग प्लस चार मजली) इमारतीच्या टेरेसवर बनवलेल्या फ्लॅटचे लोखंडी पत्रा व लोखंडी अँगलचे छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे शेड बाजूलाकरून वाहतुक सुरळीत केली.

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?

 

रस्त्यांसह सोसायट्यांमध्ये पाण्याने रहिवाशांना त्रास

प्रमुख रस्त्यांसह काही भागातील सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरले होते. वारजेतील सह्याद्री शाळा, रविवार पेठ, सैलसबरी पार्क, पाटील प्लाझा अशा ठिकाणी पाणी शिरल्याची माहिती अग्निशमन दलाकडे आली होती.

स्वारगेट, शिवाजीनगरमधील बसस्थानकात पाणीच पाणी

मुसळधार पावसात स्वारगेट तसेच वाकडेवारी बस स्थानकात पाणीच पाणी झाले होते, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते, सध्या शाळांना सुट्या लागल्याने गावी जाणाऱ्या तसेच गावावरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अचानक झालेल्या या पावसाने प्रवाशांची तारांबळ उडाली स्थानकात चिखल झाला होता. त्यातून वाट काढत प्रवासी कसेबसे बाहेर पडले, हडपसर भागातील सोलापूर रोड, फातिमानगर चौक रस्त्यावर पावसाचे जवळपास तीन ते चार फुट पाणी वाहत होते, साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहाने बंद पडत होती. क्रोमा चौक, शेवकरवस्ती रेल्वेगेट जवळ, हडपसर इंडस्ट्रीयल, हडपसर गाव, जहागीर नगर, शिंदेवस्ती, मगरपट्टासिटी, वैदवाडी, रामटेकडी, वानवडी, बी. टी. कवडेरोड, ससाणेनगर आदी भागातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर पावसाचे पाणी साचलेले होते. शिंदेवस्तीत वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले.

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार

सिंहगड रस्त्यावर झाड कोसळून फुलविक्रेत्या महिलेचा मृत्यू

पुणे, फुल विक्रीसाठी बसलेल्या एका महिलेच्या अंगावर मोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रोडवरील नवशा मारूती मंदिराजवळ घडली. एका बनविलेल्या टपरीत महिला फूल विक्रीसाठी चसलेली होती. रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दलवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

रंजना गिरी या दत्तवाडी येथील गणेश मळा परिसरात राहण्यास आहे. गुरूवारी हनुमान जयंती असल्याने त्या सकाळीपासूनच सिंहगड रोडवरील नवश्या मारूती मंदिराजवळ फुल विक्रीसाठी बसलेल्या होत्या. दरम्यान, दुपारी अचानक वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी नवश्या मारूती मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड महिलेच्या टपरीवर कोसळले, यात महिला अडकली, गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दोनव्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटांतच रस्त्याना नाल्याचे स्वरूप आले. पावसाळी गटारांच्या झाकणांवर कचरा अडकल्याने त्याचा निचरा होऊ शकला नाही, दरम्यान, अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपूरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.

झाडपडीच्या ८२ घटना; ५२ ठिकाणी मदत

शहरात झाडपडीच्या तब्बल ८२ घटना घडल्या आहेत. वानवडी, पुणे विद्यापीठ, बाणेर, औध, सिंहगड रोड, ताडीवाला रोड, कोरेगांव पार्कसह जवळपास शहरातील २१ भागात झाडपडीच्या या घटना घडल्या आहेत. सायंकाळी सातपर्यंत प्रशासनाने यातील ५२ ठिकाणचे झाडे बाजूला काढली होती. तर उर्वरित ठिकाणी कार्य सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.

जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट

दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवसासाठी जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस दुपारनंतर, संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

 

Web Title: Heavy rain havoc in pune 1 dead city streets flooded after unseasonal downpour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.