Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ, पुढील दोन दिवसांत…

सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain in Satara) पुन्हा वाढला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिपरिप अजूनही कायम आहे. सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा वाहू लागला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2022 | 04:10 PM
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ, पुढील दोन दिवसांत…
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain in Satara) पुन्हा वाढला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिपरिप अजूनही कायम आहे. सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा वाहू लागला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात शनिवारी सकाळी पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पाऊस जोर पकडला होता. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर पकडला. सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पेरणीसह भाताच्या मागणीच्या कामांना वेग आला आहे.

पावसाच्या जोरामुळे विविध तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे . तेथील ओढे, नाले-नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे घाट रस्त्यावर छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत. सातारा ठोसेघर मार्गावर बोरणे घाटाच्या हद्दीमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने तेथील वाहतुकीवर परिणाम झाला असून, बांधकाम विभागाने तातडीची मदत यंत्रणा तेथे रवाना केली. सज्जनगड परिसरामध्ये दरडी कोसळून यासाठी मेटल पिचिंग करण्याचा प्रस्ताव पुढे आला.

मान्सूनच्या आगमनामुळे पश्चिम भागातील डोंगररांगांमध्ये वजराई भांबवली. या ठिकाणच्या धबधबे प्रवाहित झाले असून भांबवली वजराई धबधबा तीन टप्प्यात कोसळत आहेत. पावसाळी पर्यटन बहरू लागले असून, पाऊस शेतीस पूरक असल्याने भात लागणीसह खरीपातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने हा भाग कोरडाच आहे.

दहिवडी खंडाळा कोरेगाव पूर्व इत्यादी भागांमध्ये रिमझिम पाऊस पडत असून, म्हणावा तसा पावसाला जोर नाही. कोयना, कण्हेर, धोम, बलकवडी, मोरणा गुरेघर तारळी या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणामध्ये शनिवारी सकाळी 76 मिलिमीटर नवजा येथे 89 महाबळेश्वर मध्ये 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Heavy rain in satara district increase in dam water too nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2022 | 04:10 PM

Topics:  

  • मुसळधार पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.