नागपूर : जुलैच्या मध्यपर्यंत खोळंबलेल्या मान्सूनने विदर्भात अलिकडेच विदर्भात दमदार (Heavy Rain in Vidarbha) हजेरी लावली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. 4 जिल्ह्यांमध्ये तर सरासरीही ओलांडली आहे. 25 जुलैपर्यंत विदर्भात सरासरीच्या 7 टक्के अधिक पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे. 1 जून ते 25 जुलैदरम्यान 426.7 मिमी सरासरी पाऊस होते. यंदा मात्र 457.6 मिमी पाऊस कोसळला आहे. त्यातही यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पावसाने हाहाकार माजविला.
यवतमाळात 30 टक्के अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत 388 मिमी सरासरी पाऊस होते. यंदा मात्र 503 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक गावांनी पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हेलिकॉप्टर बोलवावे लागले होते. भंडारा जिल्ह्यातही ओलांडली असून, आतापर्यंत 589 मिमी पाऊस झाला. हे प्रमाण 23 टक्के अधिक आहे. चंद्रपूरमध्ये सरासरीच्या 10 टक्के तर गडचिरोलीत 15 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
नागपूर, वर्धा, अमरावतीत तूट विदर्भातील एकूण 11 पैकी केवळ 3 जिल्ह्यांमध्येच सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात सरासरी आणि झालेल्या पावसात फारसे अंतर नाही. जिल्ह्यात 432 सरासरी पाऊस होतो. यंदा 407 मिमी पाऊस यापूर्वीच झाला असून 6 टक्क्यांची तूट आहे. वर्धा जिल्ह्यात 15 टक्के कमी पाऊस झाला. अमरावतीत सरासरी 364 मिमी पाऊस होतो यंदा आहे.