हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार!; मेट्रो स्थानकांबाहेर ४२६ कोटींतून बनणार २१ जोडरस्ते
याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८ महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांबाहेर सुमारे १९.२ किलोमीटर लांबीच्या २१ अंतर्गत जोडरस्त्यांचे जाळे विणण्यात येणार असून, यामुळे वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या हिंजवडीला मोठा दिलासा मिळणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार असून, या खर्चाचा ५०:५० टक्के भार दोन्ही यंत्रणा समान उचलणार आहेत.
डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत १२ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ वाहनांचा विचार न करता, पर्यावरणपूरक प्रवासाला चालना आधुनिक देण्यासाठी पादचाऱ्यांसाठी आणि पदपथ सायकलस्वारांसाठी स्वतंत्र ट्रॅक उभारले जाणार आहेत.
मेट्रो मार्गिका-३ च्या स्थानकांभोवती प्रशस्त जोडरस्ते, सुरक्षित पदपथ आणि स्वतंत्र सायकल मार्ग उभारून एक सक्षम ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी उभी केली जात आहे. पीएमआरडीए आणि एमआयडीसीच्या या संयुक्त पुढाकारामुळे हिंजवडी परिसरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि शाश्वत होण्यास मदत होईल,”
पुरुषोत्तम सांगळे,
जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए
| चौक / रस्त्याचे नाव | रस्त्यांची संख्या | एकूण लांबी / वैशिष्ट्य | स्वरूप / टीप |
|---|---|---|---|
| शिवाजी चौक | ५ रस्ते | ४.९ किमी | सर्वात मोठे आहे |
| मेगापोलिस सर्कल | – | ४.०६ किमी | वर्तुळाकार रस्ता (सर्कल) |
| क्वाड्रॉन सर्कल | ३ रस्ते | ३.७ किमी | मुख्य आयटी पार्क परिसर |
| हिंजवडी स्थानक | ३ रस्ते | १.९ किमी | स्थानक परिसर |
| पाल इंडिया स्थानक | ३ रस्ते | १.६ किमी | स्थानक परिसर |
| डोहलर स्टेशन | – | १.५ किमी | ९८ मीटर रुंद रस्ता |
| विप्रो टेक्नॉलॉजीज रस्ता | – | १.१ किमी | आयटी कंपनी जोडणारा रस्ता |
| इन्फोसिस फेज २ रस्ता | – | ५०० मीटर | अंतर्गत जोडणी रस्ता |






