Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; मेट्रो उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पुण्यातील प्रमुख रोजगार केंद्र असलेले हिंजवडी थेट मध्यवर्ती भागाशी जोडले गेल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो आयटीयन्स आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 03, 2026 | 12:46 PM
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

Follow Us
Follow Us:
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन.
  • पुणे मेट्रोच्या २१८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची बहुप्रतिक्षित हिंजवडी मेट्रो सेवा अखेर प्रत्यक्षात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रोच्या तब्बल २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे मंगळवारी (दि.३) लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधितही केले.

सुमारे ८ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून उभारलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ (पिंक लाईन) चे लोकार्पण झाले. या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली गेली.

हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर दरम्यान धावणारी सुमारे २३ किलोमीटर लांबीची ही ‘पिंक लाईन’ माण ते डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्थानकाला जोडते. पुण्यातील प्रमुख रोजगार केंद्र असलेले हिंजवडी थेट मध्यवर्ती भागाशी जोडले गेल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो आयटीयन्स आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमआरडीएने पुणेरी मेट्रोसाठी सवलत करारानुसार अंतरावर आधारित अधिकृत भाडेदर निश्चित केले आहेत.

13500 कोटींच्या दुसऱ्या टप्प्याची रूपरेषा

पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या दुसऱ्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या काही मार्गाचा समावेश असून, यामुळे शहराच्या सर्व दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे.

मेट्रो वेळापत्रक आणि फेऱ्या

मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होईल. पीक अवर्समध्ये दर ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावेल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयासाठी शेवटची ट्रेन रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालयावरून माणकडे रात्री ११.४० वाजता शेवटची गाडी सुटेल. जिल्हा न्यायालय स्थानकावर महामेट्रोच्या लाईन-१ व लाईन-२ शी थेट इंटरचेंज जोडणी देण्यात आली असून, प्रवाशांसाठी संयुक्त अॅप आणि ‘एनसीएमसी’ कार्डची सोय असेल.

FAQ

1. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा कधी सुरू होणार?
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

2. मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले आहे.

3. पुणे मेट्रोच्या किती रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे?
तब्बल २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.

Web Title: Hinjewadi shivajinagar metro inaugurated by prime minister narendra modi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Hinjewadi-Shivajinagar Metro

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.