Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HMPV Virus in Maharashtra: महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्णांची नोंद

तमिळनाडू सरकारनेही दोन रुग्ण आढळल्याची माहिती दिली असून HMPV विषाणू कोणताही नवीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विषाणूची ओळख 2001 साली झाली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2025 | 09:52 AM
HMPV Virus in Maharashtra:  महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्णांची नोंद
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : भारतात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. बेंगळुरू, नागपूर, आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चाहत्यांची उपस्थिती पाहून रवी शास्त्री आणि रिकी

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी व्हिडिओद्वारे माहिती दिली की, HMPV हा नवीन विषाणू नाही. 2001 साली या विषाणूची प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर तो संपूर्ण जगभर पसरला आहे. हा विषाणू श्वसनमार्गातून हवेच्या माध्यमातून पसरतो आणि सर्व वयोगटांतील लोकांना प्रभावित करू शकतो. विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसतो.

चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या मिळाल्यानंतर केंद्र सरकार, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), आणि एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) लवकरच यावर आपला अहवाल सादर करेल. नड्डा यांनी स्पष्ट केले की, भारतात सामान्य श्वसन विषाणूंच्या प्रकरणांमध्ये विशेष वाढ झालेली नाही.

मुंबईत टोरेस कंपनीचा महाघोटाळा; दादरमध्ये आउटलेट उघडलं

देवेंद्र फडणवीस यांची घाबरू नये अशी विनंती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे की HMPV विषयी घाबरण्याची गरज नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हा विषाणू नवीन नाही; तो यापूर्वीही दिसून आला आहे आणि सध्या तो पुन्हा सक्रिय झाला आहे. लवकरच योग्य ती नियमावली जाहीर केली जाईल. तसेच केंद्र सरकारने राज्यांना यासंदर्भात माहिती पुरविण्याचा निर्णय घेतला असून माध्यमांनी अधिकृत माहितीच प्रसारित करावी, असेही त्यांनी सुचवले.

तमिळनाडू आणि राजस्थान सरकारचा सावधानतेचा सल्ला

तमिळनाडू सरकारनेही दोन रुग्ण आढळल्याची माहिती दिली असून HMPV विषाणू कोणताही नवीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विषाणूची ओळख 2001 साली झाली होती. आरोग्य विभागाने सांगितले की, HMPV चे संक्रमण बहुतेक वेळा स्वतःहून ठीक होणारे आहे. त्यासाठी पुरेसा आराम आणि हायड्रेशन आवश्यक असते. उपचारासाठी सहायक पद्धती वापरण्यात येतात.

सावध राहा, पण घाबरू नका, असे आवाहन सर्व सरकारांनी केले आहे.

Web Title: Hmpv virus in india maharashtra hmpv virus infection records of both patients nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • HMPV Virus

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.