राज्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर; अतिवृष्टीमुळे राज्य शासनाकडून घोषणा, आज देखील अतिवृष्टीचा…
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थिीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
मुंबई : मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना आज (बुधवार) सुट्टी जाहीर करणेबाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. त्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाचे परिपत्रक तात्काळ जाहीर केले. मुंबई उपनगर स्काऊटस् सहआयुक्त जितेंद्र महाजन सरांनी मुख्यमंत्री महोदयांनी समयसूचकता दाखवून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळ राज्यातील शाळांना आज (बुधवार) सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. (holiday declared today for all schools in the state due to heavy rains announcement from the state government heavy rains today too)
राज्यातील संबंधित जिल्हाधिकारी दिली माहिती व अधिकार
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थिीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून परिपत्रक जारी
प्रस्तुत प्रकरणी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पुर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या कार्यकक्षेतील / स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवल्यास उक्तप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे परिपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई संदीप संगवे यांनी काढले आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापक व संस्थाचालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आज देखील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. राज्यात यावर्षी पावसाने (Rain) उशिरा सुरुवात केली आहे. मात्र राज्यातीन अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने उशिरा सुरुवात केल्यामुळं शेतकऱ्यांनी (farmers) जी परेणी केली होती. त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र सध्या राज्यभरात समाधानकारक पाऊस होत आहे. दरम्यान, मंगळवारपासून मुंबईसह पश्चिम उपनगर तसेच ठाणे, डोबिंवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि नालासोपारा येथे मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान, आज देखील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Holiday declared today for all schools in the state due to heavy rains announcement from the state government heavy rains today too