
मुंबई : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी 3 मे पर्यंत शहरातील धार्मिक स्थळावर भोंगे लावण्यावरून (Blowing Loudspeaker at religious places) परवानगी संदर्भात आदेश दिल्यानंतर आता राज्य सरकारही अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहे. याबाबत राज्यात लवकरच गाईडलाईन्स (Loudspeaker Guidelines) येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valase Patil) यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे लावण्याबाबत वक्तव्य केलं होत. ३ मे पर्यंत मशिदीसमोर भोंगे काढण्याचा अल्टीमेटम त्यांनी दिला होता. याबाबत नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर आता राज्यातही लवकरच भोग्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबच्या गाईडलाईन्स (Loudspeaker Guidelines) येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil)यांनी दिली आहे.
[read_also content=”संगीतकार प्रफुल्ल कर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख https://www.navarashtra.com/movies/musician-prafulla-kar-passed-away-nrsr-270419.html”]
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा वाद अधिकच वाढत गेला. त्यामुळे आता हा वाद अधिक वाढत असल्याचं दिसताच राज्य सरकारनंही यावर निर्णया घ्यायचं ठरवलेलं दिसत आहे. भोंग्यांसदर्भात धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
State DGP along with the Mumbai police commissioner will formulate guidelines on the use of loudspeakers in public places. These guidelines will be issued in the next 1-2 days: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil pic.twitter.com/zgWfzWsBns — ANI (@ANI) April 18, 2022
[read_also content=”नाशिकमध्ये आता सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार https://www.navarashtra.com/maharashtra/the-loudspeakerat-all-places-of-worship-in-nashik-will-have-to-get-permission-from-the-police-nrps-270331.html”]