
HSRP registration process slow only 40 percent of vehicles in Gadchiroli district news
HSRP Number Plate : गडचिरोली : महाराष्ट्र राज्यात वाहनांसाठी अनिवार्य झालेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) ची नोंदणी प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात मंद गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत वाहनांपैकी अद्याप केवळ ३५-४० टक्के वाहनांनाच ही प्लेट्स बसवली गेली असल्याचे आढळून आले आहे. सध्या सुमारे १.२५ लाख वाहनांची एचएसआरपी नोंदणी झाली असून, जिल्हयात केवळ ६१ हजार ४१० वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत.
नागरिक ऑनलाइन नोंदणी करताना इंटरनेट सेवा, ऑनलाइन पेमेंट, आणि स्लॉट्सची असमर्थता यासारख्या अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. ग्रामीण भागात तांत्रिक समस्या जास्त गंभीर आहेत. तसेच, जिल्ह्यातील अनेक जुनी वाहने भंगारात काढली गेली असली, तरी त्यांची नोंदणी सक्रिय आहे. नोव्हेंबर २०२५ ची अंतिम मुदत जवळ येत असल्याने नोंदणी केंद्रांवर गर्दीत वाढ झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जुनी व भंगारात काढलेली वाहने; काय करावे ?
अनेक जुनी वाहने भंगारात काढली गेली आहेत, पण त्यांची नोंदणी अजूनही सक्रिय आहे. अशा आरटीओ कार्यालयात संपर्क साधावा आणि वाहनाची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज द्यावा. नोंदणी रद्द झाल्यानंतरच त्या वाहनासाठी एचएसआरपी बसविण्याची गरज राहणार नाही. नोंदणी रद्द न केल्यास, भविष्यात नवीन वाहन नोंदणीसाठी किंवा इतर कामांसाठी अडचणी येऊ शकतात.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अवजड वाहतुकीने अपघाताचा धोका
चामोर्शी. गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरून अवजड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. या मार्गावर वाहनांची वर्दव्ट वाढल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील निश्चितस्थळी स्पीडब्रेकर, बॅरिकेट्स लावण्यार्च आवश्यकता आहे. मुल-चामोर्शी-हरणघाट मार्गावरून अवजड ट्रक वाहनांना बंदी घालणे वाहनांची वेगमर्यादा चामोर्शी नगरातून, मर्यादित करणे, या उपाययोजनांची गरज आहे.
जडवाहतुकीने शहरात उड्डाण पुलाची मागणी
देसाईगंज. शहरात जड वाहतूकीमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जड वाहनामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी कुरुड फाटा ते एकलपूर फाट्यापर्यंत उडाण पूल निर्माण करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन शहरात असल्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परिणामी शहरात दिवसभर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. अशात कुरखेडा व अर्जुनी मार्गावरुन भरधाव येणाऱ्या अवजड वाहनामुळे अपघाताची स्थिती कायम असते.