Hunger strike in Anjangaon for orchard subsidy! Delay of Taluka Agriculture Department
अंजनगाव सुर्जी : फळबाग लागवडीचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने तसेच तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer) यांच्या तिरंगाइमुळे बँकेचे खाते बंद पडल्याचा आरोप करत कोकर्डा येथील प्रफुल बारब्दे यांनी १४ ऑगस्ट पासून आंदोलन सुरु केले होते. शिवसेना, युवा सेना, प्रहार, काँग्रेस, बीजेपी, बीएसपी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. हा प्रश्न रेटून धरल्यामुळे अखेर तालुका कृषी अधिकारी आर. डी. तराळ (Taluka Agriculture Officer R. D. Taral) व इतरांच्या मध्यस्थीने आश्वासन मिळाल्याने रात्री उशीरा उपोषण मागे घेण्यात आले.
अंजनगाव सुर्जी (Anjangaon Surji) येथील शासनाच्या कृषी विभागामार्फत (Agriculture Department ) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme) शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विभागातर्फे अर्ज मागितले होते. शेतकऱ्यांनी कार्यालयात फळबाग लागवडीसाठी अर्ज दाखल केले. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सीताफळ बागेची लागवड सुद्धा केली. अनेकांचे अर्ज फळबाग लागवडीच्या अनुदानाकरिता मंजूर झाले.
परंतु, एक वर्ष होत आले तरी शेतकरी अनुदानापासून वंचित असल्यामुळे त्यांनी तहसील कार्यालय तसेच तालुका कृषी कार्यालयात पायपीट करुन विचारणा केली, असता संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. येथील दप्तर दिरंगाईमुळे कित्येक शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे पैसे सुद्धा परत गेले. त्यामुळे जिल्हाधिकारी, आयुक्त व बच्चू कडू यांना ही शेतकऱ्यांनी माहिती देण्यात आली होती. मात्र, तरी देखील संबंधित विषय मार्गी लागत नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करण्यात आला. अखेर या आंदोलनाला यश आले असून आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.