Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पुणेकरांमध्ये माझी पीएचडी झालीये, त्यांनी मला त्याचं सर्टिफिकेट कधीच देऊन ठेवलंय…”; भाजपला धंगेकरांचे सडेतोड उत्तर

  • By युवराज भगत
Updated On: Apr 01, 2024 | 02:39 PM
ravindra dhangekar

ravindra dhangekar

Follow Us
Close
Follow Us:
Pune Lok Sabha News : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुणे लोकसभा निवडणूक यावेळी चुरशीची होईल असे बोलले जात आहे. निवडणुकीचे वारे वाहायला लागल्यानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघही चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी ‘हू इज धंगेकर’ असा प्रचार केला होता. आता पुणे लोकसभेतून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शिक्षणावरुन रवींद्र धंगेकरांना ट्रोल केले जात आहे. पण, धंगेकरांना ट्रोल का केलं जातंय? भाजपच्या या ट्रोलिंगवर धंगेकरांचं काय म्हणणं आहे? हे जाणून घेऊया..
मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर
पुणे लोकसभा मतदारसंघ… राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक… शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. यंदा पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे.
मागच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव
कसबा पोटनिवडणुकीवेळी हेमंत रासने भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी भाजपकडून ‘हू इज धंगेकर’ असा धंगेकरांविरुद्ध प्रचार करण्यात आला होता. आणि आता भाजपकडून शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मविआचा अशिक्षित उमेदवार असा प्रचार केला जातोय.
शिक्षणाविषयीचं एक प्रमाणपत्र व्हायरल
सोशल मीडियावर धंगेकरांच्या शिक्षणाविषयीचं एक प्रमाणपत्र व्हायरल करुन ट्रोल केलं जातंय. त्यावर मागच्या वर्षी ‘हू इज धंगेकर’ हे लोकांना कळलं आणि त्यांनी दिलेलं मत हेच माझ्यासाठी ‘पीएचडी’ आहे, असं म्हणत भाजपच्या ट्रोलिंगला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
धंगेकरांनी भाजपच्या ट्रोलिंगवर दिलेली प्रतिक्रिया
कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटलांचं शिक्षण काढणार का तुम्ही? जनतेची नाळ अन् जनतेचा विकास यात माझी पीएचडी झाली आहे. जनतेला काय हवं ते मला कळतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षणही आठवी होतं. वसंतदादा पाटील वैद्यकीय शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात आणले. चौथी पास असल्याचे म्हणतात, असे धंगेकर यांनी सांगितले.
तर मग राज्यातील ८३ टक्के तरुण बेरोजगार का
तुम्हाला शिक्षणाचं एवढं ज्ञान आहे तर मग राज्यातील ८३ टक्के तरुण बेरोजगार का फिरताहेत? माझं शिक्षण काढणं हा विरोधकांचा दूधखुळेपणा आहे. पुणेकरांमध्ये माझी पीएचडी झाली आहे, त्यांनी मला त्याचं सर्टिफिकेट कधीच देऊन ठेवलंय.”, असं धंगेकर म्हणालेत.

Web Title: I got my phd from punekar they never gave me his certificate dhangekars bitter reply to bjp nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • Pune Lok Sabha constituency
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये ‘या’ कारणामुळे पेटले युद्ध
1

एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये ‘या’ कारणामुळे पेटले युद्ध

Municipal Elections News: महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट सज्ज; धंगेकरांचा स्वबळाचा नारा”
2

Municipal Elections News: महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट सज्ज; धंगेकरांचा स्वबळाचा नारा”

Ravindra Dhangekar : शिवसेनेने रवींद्र धंगेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
3

Ravindra Dhangekar : शिवसेनेने रवींद्र धंगेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.