Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh case: ‘मी संतोष देशमुखांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता..’; गोपनीय साक्षीदारांनी जबाबात सगळंच सांगितलं

वाल्मिक कराडने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्या तयार केल्या आहेत. या टोळ्यांच्या मदतीने तो विविध कंपन्यांकडून खंडणी वसूल करतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 08, 2025 | 09:56 AM
Santosh Deshmukh case: ‘मी संतोष देशमुखांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता..’; गोपनीय साक्षीदारांनी जबाबात सगळंच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

बीड:  बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या जबाबांमधून कराड, चाटे आणि घुले टोळीच्या दहशतीचा विस्तृत खुलासा झाला आहे. तसेच, हत्येच्या कटासंबंधीची सखोल माहिती मिळाली असून, तपासासाठी हे जबाब निर्णायक ठरणार आहेत.

देशमुख यांच्या हत्येचा कट नेमका कसा, कुठे आणि कधी रचला गेला, यासंदर्भात या जबाबांमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवाय, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीची दहशत कशा प्रकारे पसरलेली आहे, हेही यातून स्पष्ट झाले आहे. तसेच पाच गोपनीय साक्षीदारांनी आपल्या जबाबांमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि त्यांच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

गोपनीय साक्षीदार क्रमांक 1

तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करत असताना गोपनीय साक्षीदार उपस्थित होता. त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेला संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला.

विष्णू चाटे: “आम्ही पैसे कमावतो, आणि तुम्ही मात्र सर्व नासवता. ना स्वतःची प्रतिष्ठा राखली, ना आमची. तुला प्लांट बंद करायला सांगितले होते, पण तू काही करू शकला नाहीस. उलट, रिकाम्या हाताने परत आलास!”

सुदर्शन घुले: “आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो, पण संतोष देशमुख आडवा आला. त्याने आम्हाला थांबवले आणि मस्साजोग गावातील लोकांनीही आम्हाला हाकलून दिले.”

विष्णू चाटे: “वाल्मिक अण्णांचा स्पष्ट आदेश आहे—काम थांबले नाही, खंडणी मिळाली नाही, आणि जर संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा. बाकीच्यांनाही समजेल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर काय परिणाम होतो!”

सुदर्शन घुले: “यावेळी मी कंपनी बंद करण्यासाठी पक्की व्यवस्था करतो. कोणीही आडवा येणार नाही!”

हा जबाब गोपनीय साक्षीदाराने तपास अधिकाऱ्यांना दिला आहे.

गोपनीय साक्षीदार क्रमांक 2

6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीत झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर, मी संतोष देशमुख यांना फोन करून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, “सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत!” त्याचवेळी, वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांकडून वारंवार खंडणी मागितली जात असल्याचे मी निदर्शनास आणले होते. यापूर्वी मलाही वाल्मिक कराडने धमकी दिली होती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवले होते.

Crime News : कुरकुरे देण्याच्या बहाण्याने चिमुरड्याला घरात बोलावलं अन्…; 21 वर्षाच्या नराधमाच्या कृत्याने सांगलीत संतापची लाट

गोपनीय साक्षीदार क्रमांक 3

वाल्मिक कराडने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्या तयार केल्या आहेत. या टोळ्यांच्या मदतीने तो विविध कंपन्यांकडून खंडणी वसूल करतो.

  • जर कोणी खंडणी देण्यास नकार दिला, तर त्यांच्या कंपनीला बंद करण्याची वेळ येते.
  • जो कोणी या कारवायांना विरोध करतो, त्याला जबर मारहाण किंवा अपहरण करून दहशत निर्माण केली जाते.
  • त्यामुळे कोणीही वाल्मिक कराडविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची हिंमत करत नाही.
  • जर कोणी तक्रार नोंदवण्यासाठी गेले, तरी पोलिस ती तक्रार स्वीकारत नाहीत.

वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी झालेली आंदोलने त्याच्या टोळीतील गुंडांनीच आयोजित केली होती.

गोपनीय साक्षीदार क्रमांक 4

या साक्षीदाराने सांगितले की, बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्याला विनाकारण अडकवण्यात आले. परिणामी, त्याला 90 दिवस बीड जिल्हा कारागृहात राहावे लागले.

  • वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे संपूर्ण जिल्ह्यात त्याचीच हुकूमशाही चालते.
  • पोलिस ठाण्यात त्याच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.
  • विशेष म्हणजे, त्याच्या टोळीतील गुन्हेगार गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही.
  • त्याच्या भीतीमुळे लोक तक्रार करण्याची हिंमत करत नाहीत.

गोपनीय साक्षीदार क्रमांक 5

प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही सुदर्शन घुलेला भाऊ मानायचे आणि त्याला ‘भाऊ’ म्हणून हाक मारायचे.

  • गाव आणि परिसरात या तिघांची मोठी दहशत होती.
  • हे तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करत आणि विविध ठिकाणी खंडणी गोळा करायचे.
  • त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

Web Title: I had advised santosh deshmukh to be careful confidential witnesses told everything in their statements nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी
1

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
2

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण

वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3

वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?
4

Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.