कुरकुरे देण्याच्या बहाण्याने चिमुरड्याला घरात बोलावलं अन्...; 21 वर्षाच्या नराधमाच्या कृत्याने सांगलीत संतापची लाट
सांगली : पुण्यात स्वारगेटमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाला. त्यानंतर थेट केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली गेली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एक 6 वर्षाच्या चिमुकला एका नराधमाच्या वासनेचा शिकार झाला आहे. त्यांनी त्या या चिमुकल्याबरोबर किळसवाणे कृत्य केल्याचेही समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरामध्ये घडली. लोकेन केवलराम कासडे (२१) असं आरोपीचं नाव असून तो मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे.
कामा निमित्त तो कवठेमहांकाळ शहरात असतो. तो विठुरायाचीवाडी इथं राहतो. ज्यामुलाला त्याने लक्ष केलं तो मुलगा आणि त्याचे कुटुंबिय या कासडेचे ओळखीचे होते. या ओळखीचाच गैरफायदा या नराधमाने घेतला.
दुपारच्या सुमारास हा मुलगा घरा बाहेर खेळत होता. त्याच्या घरातले कामात व्यस्त होते. त्याच वेळी या नराधमाने कुरकुरे देतो असं अमिष त्या चिमुकल्याला दिलं. शिवाय त्यानंतर आणखी खाऊसाठी पैसे ही देतो असं सांगितलं. त्यानंतर त्या मुलाला तो आपल्या खोलीत घेवून गेला. त्यानंतर त्याच्यावर तिथेच अनैसर्गिक अत्याचार केले. मुलगा या सर्व गोष्टीने हादरून गेला होता. घाबरत घाबरत त्याने आपले घर गाठले.
घरी गेल्यानंतर त्याने झालेला प्रकार पालकांना सांगितला. त्याने सांगितलेला प्रकार ऐकून त्याच्या पालकाच्या पायाखालची वाळू सरकली. पीडित मुलाच्या पालकांनी तातडीने कवठेमहांकाळ पोलिस स्थानक गाठले. तिथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कवठेमहांकाळ शहरामध्ये खळबळ माजली आहे. शिवाय तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .