MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये टेक आणि स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे नवीन गॅजेट्स आणि अनोख्या संकल्पना सादर केल्या. या इव्हेंटमध्ये आपल्याला भविष्यातील टेक्नॉलॉजीची एक झलक पाहायला मिळाली. 3 मार्चपासून सुरू झालेला हा इव्हेंट 6 मार्च रोजी संपन्न झाला. इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी MWC ने त्याचं यंदाचे वार्षिक विजेते जाहीर केले. यावेळी एकूण 7 श्रेणींमध्ये 33 पुरस्कार देण्यात आले. यातील काही पुरस्काराबद्दल आता आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
या इव्हेंटमध्ये Pixel 9 Pro ला त्याच्या ‘सर्वोत्कृष्ट परफॉर्मेंस, इनोवेशन आणि लीडरशिप’ या सर्वांसाठी बेस्ट स्मार्टफोन हा अवॉर्ड देण्यात असाल. Pixel 9 Pro ने बेस्ट स्मार्टफोनचा बहुमान मिळवत iPhone 16 Pro, Galaxy S24 Ultra, Magic V3, आणि vivo X200 Pro सारख्या डिव्हाईसना मागे सोडलं. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये Google Pixel ने सलग दुसऱ्यांदा हा विजय मिळवला आहे. ज्यामुळे आता Google Pixel हा iPhone आणि Samsung Galaxy च्या कॅटेगरी मध्ये आला आहे. सहसा MWC पुरस्कारांमध्ये iPhone आणि Samsung galaxy वर्चस्व गाजवतात. पण गेल्या 2 वर्षापासून हा बहुमान Google Pixel पटकावत आहे.
2016 मध्ये जेव्हा गुगलने पहिला Google Pixel लाँच केला तेव्हा त्याचे ध्येय एक महत्त्वाकांक्षी होते. 2021 मध्ये Google Pixel 6 च्या रीडिझाइनसह पिक्सेलला त्याची खरी ओळख मिळाली. त्याला कदाचित ग्लोमो पुरस्कार मिळाले नसतील, परंतु त्याच्या अद्वितीय डिझाइनमुळे ते एक लोकप्रिय डिव्हाईस बनले आणि बघता बघता Google Pixel ने लोकांच्या मनावर राज्य केलं.
ब्रेकथ्रू इनोव्हेशन पुरस्कार हा डिव्हाइसच्या मुख्य हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी आहे. ही कॅटेगरी प्रोसेसर, कॅमेरे, स्क्रीन आणि इतर तंत्रज्ञानासाठी आहेत आणि Gemini ने एंड कंज्यूमरसाठी डिझाइन केलेल्या जनरेटिव्ह AI ने ज्युरींचे मन जिंकले. इतर नॉमिनेटेड टेकमध्ये Galaxy AI, Snapdragon 8 Elite चिपसेट, आणि Huawei Mate XT चा ट्राई-फोल्ड हिन्ज यांचा समावेश होता.
बेस्ट कनेक्टेड कंझ्युमर डिव्हाइस कॅटेगरी ही सर्वात डाइवर्स आणि मोबाइल प्रोडक्ट्स, गैजेट्स, सर्विसेज, सॉल्यूशन्स आणि एप्लिकेशन्ससाठी खुली आहे.विजेता Mega Mini Gaming G1 हा जगातील सर्वात छोटा वाटर-कूल्ड गेमिंग मिनी PC आहे, जो Intel Core i9-13900H प्रोसेसर आणि GeForce RTX 4060 GPU सह येतो. याची किंमत $1,699 आहे आणि ते गेल्या काही महिन्यांपासून बाजारात उपलब्ध आहे.
WhatsApp Update: आनंदाची बातमी! मेसेजिंग अॅपमध्ये होणार मोठा बदल, Meta AI ला मिळणार नवीन लूक
‘बेस्ट इन शो’ श्रेणी ही मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये घोषित केलेल्या प्रॉडक्ट्ससाठी आणि डिव्हाईससाठी आहे. बेस्ट इन शोचा बहुमान Xiaomi 15 Ultra ने पटकावला आहे.