महाराष्ट्रला नवे मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (३० जून) सायंकाळी चार वाजता ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. मुख्य सचिव हे राज्याती सर्वोच्च आयएएस पद असून मुख्य सचिव मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार म्हणून काम करतात.
राज्याच्या विद्यमान मुख्य सचिव सुजाता सैनिक आज निवृत्त होतआहेत. सैनिक यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदाची सुत्रे राजेशकुमार मीना यांच्याकडे सुपूर्द केली जातील.सैनिक यांच्या निवृत्तीनंतर सचिवपदासाठी मुंबई मबहापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी,गृह विभागाचे अपर सचिव इक्बालसिंग चहल यांच्या नावाची चर्चा होती. पण सेवा ज्येष्ठतेनुसार, राजेशकुमार मीना यांना संधी मिळाली आहे.
Maharashtra Assembly Session : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी- विरोधकांचे आंदोलन
राजेशकुमार मीना हे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पण राजेशकुमार यांना केवळ दोन महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये ते निवृत्त होत आहेत. जर राज्य सरकारकडून मुदतवाढ मिळाली तर ते त्या पदावर कायम राहू शकतात.
राजेशकुमार हे सर्वात ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केलं आहे. सचिवपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. खरंततर, भूषण गगरानी आणि इक्बालसिंग चहल यांची नावे आघाडीवर असतानाही सेवा ज्येष्ठतेच्या कारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजेशकुमार मीना यांच्या नावाला पसंती दिली.
Assembly Monsoon Session 2025 : मराठी भाषेवरुन अधिवेशन गाजणार; सत्ताधाऱ्यांचे आंदोलन
परंतु मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार मीना यांना केवळ दोन महिन्याचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. कारण ते ऑगस्ट 2025 मध्ये निवृत्त होत आहेत. जर, सरकारने त्यांना मुदतवाढ दिली तर ते पदावर कायम राहतील. याशिवाय राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजेशकुमार यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी अजोय मेहता, नितीन करीर या दोन मुख्य सचिवांना देखील मुदतवाढ देण्यात आली होती.