विधीमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये हिंदी भाषेवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधणार (फोटो - टीम नवराष्ट्र)
Assembly Monsoon Session 2025 : मुंबई : राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. आजपासून विधीमंडळामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. यंदाच्या अधिवेशामध्ये प्राथमिक शाळांमधील त्रिसूत्री भाषांचे समीकरण, शक्तीमार्ग, मराठा आरक्षण असे अनेक मुद्दे गाजणार आहेत. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका देखील होणार आहेत. यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन जोरदार गाजणार आहे. मराठी भाषेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार आहे.
प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. त्याचबरोबर त्रिसूत्री समीकरणावरुन तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय सूचवण्यात आला होता. पहिल्यांदा हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. मात्र राज्यातून तीव्र विरोध झाल्यानंतर हिंदी भाषा पर्यायी करण्यात आली. मात्र त्यानंतर राज्यभरातून जोरदार विरोध करण्यात आला. याविरोधात मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा देखील निघणार होता. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून यासंबंधित दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आले आहे. यानंतर देखील मराठी भाषेवरुन अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सत्ताधारी शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने प्राथमिक शाळांमध्ये त्रिसूत्री स्वीकारली असल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. आता सत्तेच्या बाहेर असल्यामुळे विरोध करत असल्याचे देखील शिंदे गटाने म्हटले आहे. याविरोधात शिंदे गटाने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ‘होय, होय त्रिभाषा सूत्र आम्हीच स्वीकारलं, कम ऑन किल मी’ असं लिहिलेले बॅनर्स विधानभवनाच्या पायऱ्यांवर झळकले आहेत. सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाविरोधात आंदोलन केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर विरोधकांनी देखील मराठी भाषेवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. जीआर रद्द करण्यात आला असला तरी हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जाब विचारणार असल्याचा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. तर शासन आदेश रद्द करण्यात आला असला तरी लेखी आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.
त्याचबरोबर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील या विषयावरुन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला. आपलं पाप लपवण्यासाठी उद्धव ठाकरे हा सगळा प्रयत्न करत होते, पाप झाकण्याचा जर प्रयत्न असेल तर तो चित्रपट उबाठावर निघू शकतो. मुंबईमध्ये नेत्यांच्या मुलाना फ्रेंच, इंग्रजी शिकवतात. आमच्या ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबत इंग्रजी का शिकवू नये ? हिंदी का शिकू नये त्यांना समोर का? जाता येऊ नये. त्यांची विजय सभा ही पक्ष वाढीसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना घ्यावीच लागेल. स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावी लागते. यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे, असा टोला खासदार अनिल भोंडे यांनी लगावला आहे.