अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी- विरोधकांचे आंदोलन (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Assembly Session News in Marathi : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (30 जून) सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात १२ विधेयके मांडली जाणार आहे. मात्र त्याचपूर्वी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री ठाकरे गटाविरोधात आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत कम ऑन किल मी म्हटले होते. त्याच्या खिल्ली उडवत शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा देत होत.
शिवसेनेच्या ५९ व्या स्थापनादिनाच्या दिवशी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते की, कम ऑन किल मी,असं म्हटलं होते. यावर शिंदे यांनी तर उद्धव यांना लक्ष्य करत म्हटले आहे की, ‘मेलेल्या माणसाला मारण्याची काय गरज आहे…’ असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता. या टिकेनंतर शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री ठाकरे गटाविरोधात आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे.
तसेच या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा अभ्यास सुरू करण्यास वाढत्या विरोधाला तोंड देत, राज्य मंत्रिमंडळाने रविवारी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबतचे दोन जीआर (सरकारी आदेश) मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जीआर मागे घेण्यात आले आहेत.
विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यावेळी मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार राज्याला विकासाकडे नेण्याच्या दिशेने काम करत आहे. या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने सरकारने तीन आठवड्यांचे अधिवेशन प्रस्तावित केले आहे. या अधिवेशनात एकूण १२ विधेयके मांडली जातील आणि एक प्रलंबित विधेयक आणि संयुक्त समितीचे एक विधेयक यावरही चर्चा केली जाईल.
यासोबतच सहा अध्यादेश मांडले जाणार आहेत. जून महिन्यात राज्यात पावसाची परिस्थिती समाधानकारक असून पेरणीही चांगली झाली आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत यासाठी यंत्रणा काम करत असल्याचे आणि काही ठिकाणी तक्रारींचे निराकरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करेल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकार जनभावनेचा आदर करते आणि सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करते. स्टार्टअप्स, जीडीपी, परकीय गुंतवणूक इत्यादींमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.