Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali IAS transfer: सांगलीला नवे जिल्हाधिकारी! डॉ. मैनक घोष यांची नियुक्ती; अशोक काकडे यांची मुंबईत बदली

डॉ. मैनक घोष हे २०१९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असून ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत . त्यांची ओळख एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 28, 2026 | 10:22 AM
Sangli District Collector Transfer, Dr. Mainak Ghosh IAS, Ashok Kakade IAS, Sangli News 2026,

Sangli District Collector Transfer, Dr. Mainak Ghosh IAS, Ashok Kakade IAS, Sangli News 2026,

Follow Us
Follow Us:
  • आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री अचानक बदल्या
  • सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे अनुभवी व जेष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख
  • डॉ. मैनक घोष यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
 

Sangali IAS transfer: राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. मैनक घोष यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घोष हे सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.

सांगली पॅटर्न थांबला

सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे अनुभवी व जेष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, आता त्यांची बदली मुंबई येथे कृषी औद्योगिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे, अशोक काकडे हे लोकाभिमुख अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनी सांगली पॅटर्न अभियानांतर्गत अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले, त्यामध्ये दिव्यांग कल्याण, कामगार कल्याण, शिक्षण, आरोग्य व इतर सामाजिक जाणिवा ठेवून शासकीय संवेदनशीलता जागृत ठेवली होती, ज्यातून सांगली जिल्ह्यात लोकप्रिय झाले होते; मात्र अचानक झालेल्या बदलीने सामन्यांमध्ये चर्चा होत आहे, मात्र ही प्रशासकीय बदली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Malatpur Arogya Kendra: जिल्हा परिषदेच्या पहिल्याच बैठकीत मांडणार मालतपूरचा प्रश्न; डॉ. प्रिया शिंदेंचा वाईकरांना शब्द

 

कर्तव्यदक्षतेचा आदर्श

डॉ. मैनक घोष हे २०१९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असून ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत . त्यांची ओळख एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहे. गतवर्षी धाराशिव जिल्ह्यात महापूर आला असताना, डॉ. घोष यांनी आपल्या कामातून प्रशासकीय अधिकाऱ्याचा खरा आदर्श घालून दिला होता. आपल्या वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्यावर अंत्यसंस्कार उरकून डॉ. घोष दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले होते]. त्यांच्या या समर्पित वृत्तीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला?

धाराशिवलाही मिळाल्या नव्या सीईओ

दरम्यान, डॉ. मैनक घोष यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडळदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंवदा या मूळच्या रत्नागिरीच्या असून त्या २०२२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत महाराष्ट्रातून १३ वा क्रमांक मिळवला होता. सांगली जिल्ह्याच्या विकासाची आणि प्रशासनाची धुरा आता डॉ. मैनक घोष यांच्यासारख्या अनुभवी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या अधिकाऱ्याच्या हातात आली आहे.

 

 

Web Title: Ias transfer update dr mainak ghosh appointed as new district collector of sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • sangli news

संबंधित बातम्या

TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे
1

TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?
2

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.