मुंबई : आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची बदनामी करायची, धाडी घालायच्या, मालमत्तांवर टाच आणायची हे शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या. चला मी तुमच्याबरोबर येतो. मला आधी तुरुंगात टाका, मग पुरावे गोळा करा; पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी काेराेना काळातील भ्रष्टाचार, महापालिकेतील घोटाळे यांना उत्तर दिलेच; पण मंत्री नवाब मलिक यांची जोरदार पाठराखण केली.
मुदस्सर लांबे यांना हार घालून सन्मान करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यावेळी कदाचित त्यांच्यावरील गुन्ह्याची आपल्याला माहिती नसेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला. लांबे यांच्या पत्रावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची स्वाक्षरी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
[read_also content=”5 दिवशीही इंधन दरात चौथ्यांदा वाढ, पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागणार https://www.navarashtra.com/maharashtra/fuel-price-hike-for-the-fourth-time-in-5-days-petrol-by-82-paise-and-diesel-by-81-paise-nrps-259863.html”]