Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदानकार्ड नसलं तरी करता येणार मतदान; ‘ही’ ओळखपत्रं धरली जातील ग्राह्य, पण…

ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2024 | 12:08 PM
पालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर

पालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने महराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आले.

माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण

प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. एखाद्या मतदाराने मतदारयादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र, त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

Web Title: If you dont have voter id then also you can cast vote nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 12:08 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे…ही अपरिपक्वतेची लक्षणे; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?
1

“रोहित पवार यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचे…ही अपरिपक्वतेची लक्षणे; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं भडकले का?

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा; कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत नवा अल्टीमेटम,अन्यथा…
2

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा; कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत नवा अल्टीमेटम,अन्यथा…

Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना सपा, आपसह ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा; आता निवडणूक ठरणार निर्णायक?
3

Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना सपा, आपसह ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा; आता निवडणूक ठरणार निर्णायक?

Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण
4

Vice President Election : भाजपच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी दिसले चक्क शेवटच्या रांगेत; चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.