Maharashtra Rain Alert: पुढील 48 तास घरातच थांबा! राज्यावर वरूणराजा कोपणार; 'या' जिल्ह्यांत चिंता वाढली
राज्यात पावसाचा जोर वाढणार
पुढील 48 तास महाराष्ट्रात कोसळधार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढणार
Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पोशाक हवामान तयार झाले आहे. सध्या परतीच्या पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढला आहे. कोकण, मराठवाडा, कोकण भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा, सोलापूर, विदर्भ भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात 30 तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात तसेच ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे , सातारा, पश्चिम महाराष्ट तसेच सोलापूर, धारशिवमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अजून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरचे संकट अजूनही संपले नसल्याचे म्हटले जात आहे. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना सतर्क तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत केली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…
मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.