राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात पावसाचा जोर वाढणार
बळिराजासमोर मोठे संकटे उभे राहणार
राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता
IMD Rain Alert: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा, विदर्भात तर पावसाने नुसता धुमाकूळ घातला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभगाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये कायम असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा भागात मोठे नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लाखों हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने एक नवीन इशारा दिला आहे.
अजून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरचे संकट अजूनही संपले नसल्याचे म्हटले जात आहे. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना सतर्क तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत केली जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश
मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे.