Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: पुढील 24 तास राज्यासाठी महत्वाचे; IMD ने दिला ‘हा’ इशारा

सध्या पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे.  राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी 35 अंशाच्या वरपर्यंत तापमान पोहोचले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2025 | 07:48 PM
Maharashtra Weather: पुढील 24 तास राज्यासाठी महत्वाचे; IMD ने दिला ‘हा’ इशारा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: सध्या पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे.  राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी 35 अंशाच्या वरपर्यंत तापमान पोहोचले आहे. दरम्यान उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान उन्हाच्या झळा बसत असतानाच हवामान विभगाने राज्यासाठी एक इशारा दिला आहे. आयएमडीने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडी म्हणजे हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासाह पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यावर सध्या उष्णतेची लाट आणि जोरदार पाऊस असे दुहेरी संकट पाहायला मिळत आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याला अवकळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, लातूर , धारशिव, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळख असलेल्या कोयनेच्या पाणीसाठ्यात घट

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी तीव्र उन्हाळ्याने घटू लागली असून नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडू लागले आहे, त्यामुळे जलाशयातील बेटे दिसू लागली आहेत. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयनेची पाणी पातळी यावर्षी शंभर टक्के भरली होती. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वीज निर्मिती, शेतीसाठी व पिण्याचे पाणी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणी दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषतः सोळशी व कोयना नदीच्या खोऱ्यातील तापोळ्याच्या वरील भागातील पाणी वेगाने कमी होवून या भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या भागातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठीही नदीपात्रातील पायी चालण्याचे अंतर वाढत आहे. त्यामुळे पर्यटक संख्या ही कमी होवू लागली आहे.

Koyna Dam: महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळख असलेल्या कोयनेच्या पाणीसाठ्यात घट; वीजनिर्मितीवर परिणाम होणार?

पुण्यात ‘पाणीबाणी’! टँकरच्या 4 लाख फेऱ्या

एकीकडे समान पाणी पुरवठा (चाेवीस तास) याेजनेचे काम सुरु असले तरी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा त्याच प्रमाणात वाढत आहे. यावर्षी टॅंकरच्या सुमारे चार लाख ४ हजार इतक्या फेऱ्या झाल्या अाहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात चार हजारांनी वाढ झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याची मागणीत वाढ हाेत आहे.  गेल्या दोन महिन्यांत टॅंकरच्या फेऱ्या वाढत आहे.  जानेवारी महिन्यात ३९ हजा

Web Title: Imd rain alert to maharashtra for next 24 hours konkan and middle maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • imd
  • Maharashtra Rain Update
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
1

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

Weather Alert : सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; महाबळेश्वर-जावळीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ
2

Weather Alert : सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; महाबळेश्वर-जावळीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.