Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Alert 2026: अरे देवा! आणखी एका चक्रीवादळाचा धोका; राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Cyclone Alert 2026: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत तीव्र होऊन डिप्रेशनमध्ये आणि १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान प्रणालीमुळे ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 06:15 PM
अरे देवा! आणखी एका चक्रीवादळाचा धोका, राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

अरे देवा! आणखी एका चक्रीवादळाचा धोका, राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
  • पुढील २४ तासांत तीव्र होण्याची शक्यता
  • दिल्ली-NCR मध्येही पावसाचा अंदाज
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता ठळक झाले असून, पुढील २४ तासांत त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे डिप्रेशन चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(Cyclone Alert 2026)

१६ नोव्हेंबरला चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता

हवामान विभागाच्या १४ नोव्हेंबरच्या बुलेटिननुसार, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते. त्यानंतर ही प्रणाली उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. मात्र, या चक्रीवादळाचा पुढील मार्ग आणि ते कुठे धडकणार याबाबत अद्याप निश्चित अंदाज जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुढील हवामान बुलेटिनकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता

या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ओडिशामध्ये १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यानम परिसरातही या दोन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल भागात १५ नोव्हेंबरला अनेक ठिकाणी, तर १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. केरळमध्येही १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने समुद्र खवळलेला राहू शकतो. १७ नोव्हेंबरपासून मध्य बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा वेग ताशी ६५ ते ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची आणि झोतांचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. समुद्रात असलेल्या मच्छीमारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत किनाऱ्यावर परतावे, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. तसेच अंदमान समुद्र, अंदमान-निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरातील विविध भागांत पुढील काही दिवस मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्ली-NCR मध्येही हलक्या पावसाचा अंदाज

दरम्यान, उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. दिल्ली-NCR मध्ये १५ नोव्हेंबरच्या सकाळी काही ठिकाणी अतिशय हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अपडेटकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीची तीव्रता आणि दिशा यामध्ये पुढील काळात बदल होऊ शकतो. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक, मच्छीमार आणि संबंधित यंत्रणांनी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Narendra Modi : 4.2 कोटी एलईडींचा अद्भुत नजारा! भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Web Title: Bay of bengal cyclonic storm heavy rainfall alert odisha tamil nadu andhra pradesh sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Cyclone
  • imd
  • Odisha
  • Weather forecast

संबंधित बातम्या

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report
1

IND vs NZ: टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई! पण निर्णायक सामन्यात पाऊस ‘खेळ’ बिघडवणार; पाहा Weather Report

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report
2

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report

Weather Update: ‘तो’ पुन्हा येणार! बंगालच्या खाडीत पुन्हा वादळाचे संकट, 13 नोव्हेंबरला बदलणार हवामान
3

Weather Update: ‘तो’ पुन्हा येणार! बंगालच्या खाडीत पुन्हा वादळाचे संकट, 13 नोव्हेंबरला बदलणार हवामान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.