Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: कोल्हापुरात ‘स्त्रीशक्ती’चा जागर! महापालिका आयुक्तांपासून ते कुलगुरूपर्यंत सर्वच प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व

सत्ता प्रक्रियेमध्ये महिलांचे प्रमाण वाढले असले तरी निर्णय प्रक्रियेपासून त्यांना वंचित ठेवले जाते. परंतू सध्याच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सर्वच महिला पदवीधर आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 16, 2026 | 10:10 AM
Kolhapur News: कोल्हापुरात ‘स्त्रीशक्ती’चा जागर! महापालिका आयुक्तांपासून ते कुलगुरूपर्यंत सर्वच प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व
Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापुरात   सर्व प्रशासकीय पदांवर महिलांची सत्ता
  • महापालिका आयुक्तांपासून ते कुलगुरूपर्यंत सर्वच प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व
  • शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला म्हणून प्र कुलगुरू पदाची जबाबदारी डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे
Kolahapur News:  जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी, या म्हणीप्रमाणे देश, राज्य आणि कोल्हापुरात महिलाराज आहे. महापालिका आयुक्त, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिवाजी विद्यापीठ प्रभारी प्र कुलगुरु, विविध महाविद्यालयाच्या प्राचार्य महिलाच आहेत. आता महापालिका महापौर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही महिला असणार. प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील सर्वच महत्त्वाचे व प्रमुख पदांवर महिला विराजमान झाल्या आहेत. हा पुरुषी अहंकाराला एक प्रकारचा धक्काच म्हणावा लागेल. प्रशासकीय यंत्रणेत महिला स्वतः निर्णय घेतात.

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची

राष्ट्रपती ते जिल्हा शासन, प्रशासनावर महिलांचे वर्चस्व दिसून येत असल्याचे स्पष्ट

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. तर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारली आहे. तसेब कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के, मंजूलक्ष्मी यांची प्रशासनावर पकड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक कोल्हापूरच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. तसेच महापालिका निवडणुकही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडली, गेल्या पाच महिन्यापासून शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर उत्कृष्ट कार्य करीत आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला आहे, तसेब पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या विद्याथ्यांनी इस्रोची सहल केली.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्र-कुलगुरू

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला म्हणून प्र कुलगुरू पदाची जबाबदारी डॉ. ज्योती जाधव यांनी स्वीकारली आहे. त्या जागतिक पातळीवरील संशोधक असल्याने आपल्या संशोचन्नाचा फायदा सर्वच विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांना करून देत आहेत. तसेच राजाराम महाविद्यालय, कमला महाविद्यालय, कॉमर्स महाविद्यालय, देवचंद महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयातही महिला प्राचार्य कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संपूर्ण महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. अशा पद्धतीने शासकीय यंत्रणा व शिक्षण खाते महिला सक्षमपणे सांभाळत आहेत.

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

जिल्ह्याच्या कारभारात नारी शक्तीचा विजय होईल

सत्ता प्रक्रियेमध्ये महिलांचे प्रमाण वाढले असले तरी निर्णय प्रक्रियेपासून त्यांना वंचित ठेवले जाते. परंतू सध्याच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सर्वच महिला पदवीधर आहेत, त्यामुळे या महिला आपल्या भागात व सभागृहात स्वतःचे अस्तित्व निर्माण करतील. यातून जिल्हा परिषद महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता येईलच, पण सक्षम व निर्णय क्षमता असणाऱ्या या रणरागिणी असल्याने नारी शक्तीचा विजय होईल.

 कोल्हापुरचे वेगळे स्थान निर्माण करतील

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही ४३ महिला नगरसेवक आहेत, एवदेव नाही, तर स्याराणी निकम यांनी बहुमताने महापौर होण्याचा मान मिळवला आहे. महिलांच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही जास्तीत जास्त महिला सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने जिल्हा परिषदेचा कारभारही एक महिलाथ सांभाळणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या कारभारात महिलाराज असल्याचे निदर्शनास येते, या महिला आपल्या घराप्रमाणेच जिल्ह्याचीही प्रगती करतील. सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन राज्यातील राजकारणात कोल्हापूरचे वेगळे स्थान निर्माण करतील.

 

Web Title: In kolhapur women dominate all key positions from municipal commissioner to vice chancellor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Kolhapur Municipal Corporation Elections 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.