Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनवेलमध्ये कुत्र्यांची दहशत झाली कमी, नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास

दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 30, 2024 | 05:48 PM
पनवेलमध्ये कुत्र्यांची दहशत झाली कमी, नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात या आधी भटक्या कुत्र्यांची दहशद मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण प्रक्रिया करण्याकरिता पालिकेकडून या आधी दोनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पनवेल पालिका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हालचाल सुरु करून पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. एजन्सी नेमण्यात आल्यानंतर कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्यावर आतापर्यंत चार हजारांच्या आसपास कुत्र्यांची दहशत मोठया प्रमाणात कमी झाली असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्यामुळे वयोवृद्ध तसेच लहानमुलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी नवराष्ट्रला सांगितले.

[read_also content=”‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये आता सिनिअर सिटीझनही होणार लोटपोट https://www.navarashtra.com/movies/in-madness-machaenge-india-ko-hasaenge-senior-citizens-will-also-be-featured-540455.html”]

पनवेल परिसराचे नागरिकीकरण मोठया प्रमाणात वाढत असून सिडकोचा मोठा परिसरात या महसुली विभागात येतो. पूर्वी घर आणि शेतीचे राखण करण्यासाठी प्रत्येक घरी कुत्रे पाळले जायचे. हा प्राणी अतिशय प्रामाणिक असून तो रखवालदाराची भूमिका पार पाडीत असे. मात्र नागरीकरणाची कक्षा रूंदावल्याने शेती व्यवसाय जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आता कुत्रे पाळण्याचा कलही कमी झाला आहे. ज्यांना कोणाला आवड आहे ते विदेशी प्रजातीचे कुत्रे पाळतात. मात्र देशी कुत्रे आता निराधार झाले आहेत. परिणामी दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यांचे निर्बिजीकरण होताना दिसत नाही.

शहरी भागाचा विचार करता नवीन पनवेल, कऴंबोली, खांदा वसाहत, कामोठे, खारघर या नोडमध्ये मंध्यतरी नसबंदीचे काम बंद पडले होते. मागील वर्षभरामध्ये हजारो कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले असा दावा सिडको करीत आहे. परंतु रस्त्यावरील कुत्र्यांची दहशत कमी झालेली नाही. सर्वात धोकादायक आणि दहशतीचे वातावरण आहे ते म्हणजे पनवेल शहरात. काही वर्षांपूर्वी न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेवर निर्बिजीकरणाकरीता निवारा उभारण्यात आला होता. याकरीता खाजगी एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. मात्र ही एजन्सी आपला गोठड गुडांळून गेली. दरवाजे खिडक्या आणि छप्परसुध्दा ते बरोबर घेऊन गेले. त्यानंतर आज तागायत पालिकेने निर्बिजीकरणाकरीता एजन्सी नियुक्त केली नव्हती. परंतु आता निर्बिजीकरण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून भटक्या कुत्र्यांनवर पालिकेचे बारीक लक्ष असल्याचे आयुक्त रसाळ यांनी सांगितले.

Web Title: In panvel the fear of dogs has reduced information of commissioner dr prashant rasal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Street dogs

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar:  पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके; मनपाच्या पथकाचा कोणताही प्रतिसाद नाही
1

Chhatrapati Sambhajinagar: पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांचे तोडले लचके; मनपाच्या पथकाचा कोणताही प्रतिसाद नाही

निसर्गप्रेमी एकवटले! दिल्लीत भटके कुत्रे तर मुंबईत कबुतरांचा प्रश्न ऐरणीवर, धार्मिक-सामाजिक वादाला फुटले तोंड
2

निसर्गप्रेमी एकवटले! दिल्लीत भटके कुत्रे तर मुंबईत कबुतरांचा प्रश्न ऐरणीवर, धार्मिक-सामाजिक वादाला फुटले तोंड

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश
3

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश

श्वानांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
4

श्वानांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.